नांदेड जिल्ह्यात प्रस्थापितांना मतदारांनी नाकारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:20 AM2021-01-19T04:20:48+5:302021-01-19T04:20:48+5:30
देगलूर तालुक्यातील करडखेड येथील विद्यमान सरपंच व भाजयुमोचे तालुकाध्यक्ष पंकज देशमुख यांचे पॅनल पराभूत झाले. अंतापूर ता. देगलूर ...
देगलूर तालुक्यातील करडखेड येथील विद्यमान सरपंच व भाजयुमोचे तालुकाध्यक्ष पंकज देशमुख यांचे पॅनल पराभूत झाले. अंतापूर ता. देगलूर येथील ग्रा.पं. निवडणुकीत भाजप कार्यकर्ते हणमंत डोपेवाड यांचे पॅनल विजयी झाले. अंतापूर हे गाव आ. रावसाहेब अंतापूरकर यांचे आहे.
जिल्ह्याचे लक्ष असलेल्या मुदखेड तालुक्यातील बारड ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात गेली. येथे बाळासाहेब देशमुख यांच्या पॅनलचे १७ पैकी १६ जण निवडून आले.
धर्माबाद तालुक्यातील येताळा ग्रामपंचायतीवर शिवसेनेच्या जिल्हा परिषद उपाध्यक्ष पद्मावती सतपलवार यांचे वर्चस्व राहिले. त्यांच्या पॅनलने ११ पैकी ११ जागा मिळविल्या. माहूर तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या आसोली ग्रामपंचायतवर राष्ट्रवादीने एकहाती सत्ता मिळविली. येथे राष्ट्रवादीचे ९ पैकी ९ उमेदवार निवडून आले. किरकोळ घटना वगळता ही मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली. जिल्हाधिकारी डाॅ. विपीन ईटणकर व पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी जिल्ह्यातील नांदेड, नायगाव व मुखेड येथे मतमोजणी ठिकाणी संयुक्त भेटी देऊन पाहणी केली.