नांदेड जिल्ह्यातील शहरी मालमत्ताधारकांना सरसकट मावेजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 12:17 AM2018-08-15T00:17:26+5:302018-08-15T00:18:48+5:30

तुळजापूर-बुटीबोरी ३६१ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर येणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, हदगाव व लोहा शहरातील मालमत्ताधारकांना ग्रामीण भागापेक्षा कमी मावेजा मिळत होता. परंतु, शहरालगतच्या ग्रामीण भागास मिळणा-या मावेजाप्रमाणेच या शहरांनाही उर्वरित मावेजा तात्काळ अदा करण्यात यावा, असा शासनाने निर्णय घेतला आहे. माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे या शहरातील मालमत्ताधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे़

Nanded district's urban landlords have a right to know | नांदेड जिल्ह्यातील शहरी मालमत्ताधारकांना सरसकट मावेजा

नांदेड जिल्ह्यातील शहरी मालमत्ताधारकांना सरसकट मावेजा

Next
ठळक मुद्देजमीन अधिग्रहण : अर्धापूर, हदगाव, लोहा शहरातील मालमत्ताधारक होणार मालामाल

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : तुळजापूर-बुटीबोरी ३६१ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर येणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, हदगाव व लोहा शहरातील मालमत्ताधारकांना ग्रामीण भागापेक्षा कमी मावेजा मिळत होता. परंतु, शहरालगतच्या ग्रामीण भागास मिळणा-या मावेजाप्रमाणेच या शहरांनाही उर्वरित मावेजा तात्काळ अदा करण्यात यावा, असा शासनाने निर्णय घेतला आहे. माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे या शहरातील मालमत्ताधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे़
केंद्रीय रस्ते व वाहतूक विभागाच्या वतीने राज्यामध्ये रस्ते बांधणीचे काम सुरु आहे. त्याचाच भाग म्हणून ३६१ क्रमांकाच्या तुळजापूर-बुटीबोरी या रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण सुरु आहे. यासाठी अनेक शेतकºयांच्या जमिनीचे व शहरातील प्लॉटधारकांच्या मालमत्तेचे अधिग्रहण करण्यात येत आहे.
हे अधिग्रहण करताना शासनाच्या मार्गदर्शक सूचना क्र.१६ (ब) व २९ (ब) या नियमांचा अवलंब करण्यात येतो. यामध्ये ग्रामीण भागाला बाजारमूल्यांचा गुणांक २ तर शहरी भागास गुणांक १ प्रमाणे मावेजा दिला जातो. यामुळे ग्रामीण भागापेक्षा जास्तीच्या किमती असलेल्या शहरी भागातील प्लॉटधारकांना मात्र मावेजा कमी मिळत आहे. त्यासोबतच ज्या शेतकºयांची जमीन अधिग्रहण करण्यात येत आहे. या शेतकºयांना सरसकट मावेजा न देता यासाठीचे विशिष्ट टप्पे पाडण्यात आले आहेत. एकाच कुटुंबातील अनेक व्यक्तींच्या नावाने जमिनी असताना मावेजा मात्र एकत्रित कुटुंबपद्धतीने देण्यात येत आहे. यामुळे जमीनधारकांवर मोठा अन्याय होत आहे. यासंदर्भात शेतकºयांनी अनेक आंदोलने केली.
याची दखल घेवून माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अर्धापूर तालुक्यातील पार्डी येथे अन्यायग्रस्त शेतकºयांची भूमिका समजून घेण्यासाठी बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सरसकट मावेजा देण्यात यावा, शहरी भागासाठी २ गुणांकप्रमाणे मोबदला देण्याची मागणी केली़
दरम्यानच्या काळात नितीन गडकरी व मुख्यमंत्री फडणवीस हे नांदेड जिल्ह्याच्या दौºयावर आले असता १९ एप्रिल रोजी आ. डी. पी. सावंत, आ. अमिताताई चव्हाण व माजी आ. रोहिदास चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने त्यांची विमानतळावर भेट घेवून सरसकट मावेजा देण्याची मागणी केली होती़
यासंदर्भात २ जुलै रोजी मुख्यमंत्र्यांचे अप्पर सचिव यांच्या अध्यक्षतेखाली मावेजासंदर्भात बैठक घेण्यात आली. त्यात नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, लोहा व हदगाव शहरातील प्लॉटधारकांना गुणांक २ प्रमाणे मावेजा देण्याची चर्चा झाली़ ग्रामीण भागापेक्षा या शहरातील प्लॉटधारकांना मावेजा कमी मिळत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्यामुळे यामध्ये बदल करुन ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागातसुद्धा मावेजा देण्यात यावा. पूर्वी दिलेला मावेजा व सध्या मंजूर करण्यात आलेला मावेजा यातील फरक काढून विभागीय महसूल आयुक्तांंच्या मान्यतेनुसार ही रक्कम प्लॉटधारकांना तात्काळ अदा करण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत़
---
ज्यांच्या नावे सातबारा आहे, त्यांना...
मावेजा देताना एकत्र कुटुंबपद्धती प्रमाणे न देता त्याऐवजी ज्यांच्या नावे सातबारा उतारा आहे, त्या व्यक्तींना हा मावेजा देण्यात यावा. रस्त्यासाठी जी जमीन शासनाने अधिग्रहित केली आहे़ त्याचे टप्पे न पाडता सरसकट मावेजा देण्यात यावा. हे प्रकरण शासनाकडे विचाराधीन असल्यामुळे यावर लवकरच निर्णय अपेक्षित असून यासाठीही खा.अशोकराव चव्हाण प्रयत्नशील आहेत. खा़ चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश आल्यामुळे जिल्ह्यातील अर्धापूर, लोहा व हदगाव शहरातील प्लॉटधारकांसह ग्रामीण भागातील जमीनधारकांना न्याय मिळाला आहे़

Web Title: Nanded district's urban landlords have a right to know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.