मृत्यूदर रोखण्याचे नांदेडपुढे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:16 AM2021-05-01T04:16:56+5:302021-05-01T04:16:56+5:30
जिल्ह्याचा पॉझिव्हिटि रेटही राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक असल्याचे आढळले आहे. नांदेडचा मागील आठवड्यातील पॉझिटिव्हिटि रेट २७.२१ टक्के एवढा राहिला आहे. ...
जिल्ह्याचा पॉझिव्हिटि रेटही राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक असल्याचे आढळले आहे. नांदेडचा मागील आठवड्यातील पॉझिटिव्हिटि रेट २७.२१ टक्के एवढा राहिला आहे. तर शेजारच्या बीड जिल्ह्याचा २६.९४, जालना २४.६३ आणि औरंगाबादचा पॉझिटिव्हिटि रेट १६.३५ टक्के इतका आहे.
चौकट.....
जिल्ह्यात २०.१७ टक्के जणांनी घेतला पहिला डोस...
कोरोनावर मात करण्यासाठी सध्या लसीकरण हा एकमेव पर्याय सर्वांसमोर आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात नागरिकांनी आवश्यक प्रतिसाद दिला नाही. मात्र मागील काही दिवसात लसीकरणासाठी रांगा लागत आहेत. त्याचवेळी लसीचा तुटवडा वाढल्याने या मोहिमेला खीळ बसली आहे. ४५ पेक्षा अधिक वयाच्या ११ लाख ५९ हजार ४१९ जणांचे लसीकरण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. प्रत्यक्षात २५एप्रिलपर्यंत जिल्ह्यात केवळ २ लाख ३३ हजार ७९९ जणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. लसीकरणाची गती वाढविण्यासाठी साठा उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता आहे.
कोट.......
मागील आठवड्यात ऑक्सिजनसह रेमडिसिविरचा प्रश्न निर्माण झाला होता. यातील ऑक्सिजन पुरवठा आता सुरळीत झाला आहे. रेमडिसिविर इंजेक्शनची उपलब्धता होत असली तरीही मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी आहे. लसीकरणाची स्थिती मात्र दयनीय आहे. जिल्ह्यासाठी लसींची मागणी केली आहे. त्यानुसार पुरवठा होत नाही. नांदेडप्रमाणेच राज्यभरातील हे चित्र आहे. तरीही जिल्ह्यातील रुग्णांची संख्या कमी होत आहे. ही सकारात्मक बाब आहे. आरोग्य यंत्रणा अधिक भक्कम करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
- अशोकराव चव्हाण, पालकमंत्री, नांदेड.