नांदेडची हवा देशात सर्वात स्वच्छ एक्यूआय केवळ ६; गोदावरी नदी संसद ग्रुपचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:18 AM2021-05-20T04:18:37+5:302021-05-20T04:18:37+5:30
जैविक शुद्धीकरण पाण्यासोबत हवेलाही शुद्ध करते. या तंत्रज्ञानाचे पेटंट गोदावरी बायोटेक इंडस्ट्री नांदेडतर्फे डॉ. सुनंदा व दीपक मोरताळे यांनी ...
जैविक शुद्धीकरण पाण्यासोबत हवेलाही शुद्ध करते. या तंत्रज्ञानाचे पेटंट गोदावरी बायोटेक इंडस्ट्री नांदेडतर्फे डॉ. सुनंदा व दीपक मोरताळे यांनी दाखल केले आहे. गोदावरी नदी शुद्धीकरणासाठी बायो एन्झाइम हा जैविक पर्याय सर्वोत्तम आहे. १८ मे रोजी नांदेड येथील वायुप्रदूषण इंडेक्स एक्यूआय केवळ ६ आला आहे. भारतातही कुठल्याही शहराचा एक्यूआय हा २२ च्या खाली नाही. परिणामी नांदेड सर्वात प्रदूषणमुक्त शुद्ध हवेचे ठिकाण बनत आहे, असा दावा मोरताळे यांनी केला आहे.
बायो एन्झाइम हे ॲक्टिव्ह सूक्ष्मजीव यांना एनर्जी प्रदान करतात. त्यामुळे जल, वायूप्रदूषण मुक्त होत आहे. चंदा काबरा यांच्या मार्गदर्शनाखाली बायो एन्झाइम महिला गटामार्फत मोठ्या प्रमाणात तयार करण्यात येत आहे.
लंगर साहिब गुरुद्वारामार्फत व वृक्षमित्र परिवारामार्फत मोठ्या प्रमाणात शहरात वृक्ष जोपासना झाल्यामुळेही वातावरण प्रदूषणमुक्त होण्यासाठी मोठी मदत होत आहे. वृक्षमित्र परिवाराचे संतोष मुगटकर, प्रा. डॉ. परमेश्वर पौळ, अरुणपाल ठाकूर व सर्व सदस्यांनी मोठ्या प्रमाणात नदीतील घनकचरा काढून नदीचा श्वास मोकळा केला आहे तसेच विद्यार्थी परिषदेचे मार्गदर्शक सनतकुमार महाजन, गणेश बोडके यांनी विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात नदी प्रदूषणमुक्तीच्या कार्यास जोडले आहे.
नांदेड जिल्ह्यातील सर्व नदीप्रेमी जनतेमुळेच पर्यावरण प्रदूषण मुक्त होत आहे.