नांदेडमध्ये लग्न पत्रिकेतील नावासाठी फोडले डोके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:18 AM2018-05-14T00:18:52+5:302018-05-14T00:18:52+5:30
भावाच्या लग्नात पत्रिकेत नाव का टाकले नाही म्हणून आणि सामाईक धुरा फोडल्याच्या कारणावरुन भावकीमध्ये झालेल्या हाणामारीत परस्परविरोधी तक्रारीवरुन सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : भावाच्या लग्नात पत्रिकेत नाव का टाकले नाही म्हणून आणि सामाईक धुरा फोडल्याच्या कारणावरुन भावकीमध्ये झालेल्या हाणामारीत परस्परविरोधी तक्रारीवरुन सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ ही घटना नायगाव तालुक्यातील बरबडा येथे घडली़
१२ मे रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास संतोष रामदास आलमवाड हे घरासमोर उभे असताना बालाजी किशन आलमवाड हे त्या ठिकाणी आले़ यावेळी बालाजी आलमवाड याने भावाच्या लग्नाच्या वेळी लग्नपत्रिकेत नाव का टाकले नाही़ त्याचबरोबर सामाईक धुरा का फोडला म्हणून संतोष आलमवाड यांच्यासोबत वाद घातला़ त्यानंतर दगडाने संतोष आलमवाड यांचे डोके फोडले़ याप्रकरणी बालाजी आलमवाड यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला़
तर बालाजी आलमवाड यांच्या तक्रारीवरुन पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला़ त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार घरी असताना आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून घरात प्रवेश केला़
यावेळी संतोष आलमवाड याने शेतीच्या धुऱ्याचा वाद काढून बालाजी आलमवाड यांना मारहाण केली़ यावेळी माधव आलमवाड याने केलेला कुºहाडीचा वार बालाजी आलमवाड यांनी चुकविला़ मध्यस्थी करणाºया बालाजी आलमवाड यांच्या पत्नीलाही मारहाण करण्यात आली़
याप्रकरणी माधव गणपती आलमवाड, संतोष रामदास आलमवाड, गणेश माधव आलमवाड, योगेश माधव आलमवाड व शुभम बळीराम आलमवाड या पाच जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़