शिवसेनेची नांदेड जंबो कार्यकारिणी घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 12:22 AM2018-10-08T00:22:42+5:302018-10-08T00:23:03+5:30

महापालिका निवडणुकीपासून रखडलेली शहर कार्यकारिणी व जिल्ह्यातील इतर पदाधिकाऱ्यांची निवड अखेर शनिवारी घोषित करण्यात आली असून शिवसेनेची जंबो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे़ या कार्यकारिणीच्या निवडीनंतर अनेक निष्ठावंतांनी आपल्याला न्याय मिळाला नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे़

Nanded Jumbo Executive declared by Shiv Sena | शिवसेनेची नांदेड जंबो कार्यकारिणी घोषित

शिवसेनेची नांदेड जंबो कार्यकारिणी घोषित

Next
ठळक मुद्देसहा उपजिल्हाप्रमुखांसह चार सहसंपर्क प्रमुखांची निवड

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : महापालिका निवडणुकीपासून रखडलेली शहर कार्यकारिणी व जिल्ह्यातील इतर पदाधिकाऱ्यांची निवड अखेर शनिवारी घोषित करण्यात आली असून शिवसेनेची जंबो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे़ या कार्यकारिणीच्या निवडीनंतर अनेक निष्ठावंतांनी आपल्याला न्याय मिळाला नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे़
शिवसेनेने जाहीर केलेल्या जंबो कार्यकारिणीत सहा उपजिल्हा प्रमुख असून सात तालुका प्रमुखांचाही समावेश आहे़ नांदेड शहरासाठी एक महानगर प्रमुखासह आठ शहर प्रमुखही देण्यात आले आहेत़ जिल्हा संघटक म्हणून शेख अजमल व दयाल गिरी यांना जबाबदारी दिली आहे़ विधानसभा संघटकपदी सचिन नाईक, विश्वंभर पवार, अवधूत देवसरकर यांची निवड केली आहे़ तर तालुका प्रमुखपदी व्यंकोबा येडे, आकाश रेड्डी, राम ठाकरे, सुदर्शन राठोड, अमोल पवार, संतोष कपाटे, संजय कुरे यांची निवड केली आहे़
नांदेड शहराचे महानगर प्रमुख म्हणून अशोक उमरेकर तर शहर प्रमुख म्हणून सचिन किसवे, तुलजेश यादव, निवृत्ती जिंकलवाड यांचा समावेश आहे़ तर जिल्ह्यातील इतर शहर प्रमुख निवडताना पांडुरंग वर्षेवार, माधव वडगावकर, राहुल बेटोळे, प्रकाश दिनवार, मिलिंद पवार यांचा समावेश केला आहे़ तालुका संघटक पदाची जबाबदारी ११ जणांवर सोपवण्यात आली आहे़ त्यामध्ये अशोक मोरे, नवनाथ काकडे, स्वप्नि गारुळे, संजय काईतवाड, नारायण सोळंके, गणेश गिरी, माणिक लोमटे, बालाजी कल्याणकर, राजेश लंगडापुरे, व्यंकट भंडारवार आणि दीपक कन्नलवार यांचा समावेश आहे़ तालुका समन्वयक म्हणून उद्धव शिंदे, मुंजाजी बाºहाटे, हरिभाऊ शेट्टे, डॉ़संजय पवार, परमेश्वर पांचाळ, युवराज पवार, संभाजी पवार, ओमप्रकाश धुप्पेकर, राम कोरडे पाटील आणि अनिल रुणवाल यांच निवड करण्यात आली आहे़

  • नांदेड उत्तरचे शहर समन्वयक म्हणून निखील लातूरकर तर नांदेड दक्षिणचे शहर समन्वयक म्हणून अवतारसिंह पहेरेदार आणि नवीन नांदेडचे शहर समन्वयक राजू कुलथे हे राहणार आहेत़ शहर संघटक पदाचा भार सुरेश आराध्ये, गजानन गंजेवार, रजनीकांत जाधव, गजानन पाळसकर, शरद जैस्वाल, बाळासाहेब देशमुख, मारोती धुमाळ आणि साहेबराव मामीलवाड यांच्यावर राहणार आहे़
  • शिवसेनेच्या या जंबो कार्यकारिणी निवडीनंतर कही खुशी तर कही गम असे वातावरण झाले आहे़ लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही जंबो कार्यकारिणी कितपत उपयुक्त ठरेल हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे़

कौडगे, मारावार, पाटील झाले सहसंपर्कप्रमुख
या कार्यकारिणीत लोकसभा संघटक म्हणून डॉ़मनोजराज भंडारी यांची निवड केली असून जिल्हा समन्वयक पदी जिल्हाप्रमुख पदावरून पायउतार झालेले बाबुराव कदम यांच्यासह धोंडू पाटील यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे़ सहसंपर्क प्रमुखांच्या रांगेत भूजंग पाटलासह प्रकाश मारावार, रघुवीर मोरे आणि प्रकाश कौडगे यांनाही आणले आले़ उपजिल्हा प्रमुख म्हणून प्रदीप जाधव, गणेश मोरे, दत्ता पांगरीकर, गंगाधर बडुरे, रमेश घंटलवार आणि संजय ढेपे यांना नियुक्ती देण्यात आली आहे़

Web Title: Nanded Jumbo Executive declared by Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.