आरोग्य अभियानात नांदेड आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 12:09 AM2018-03-05T00:09:18+5:302018-03-05T00:10:05+5:30

जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिका-यांच्या अधिपत्याखाली फेबु्रवारी २०१८ अखेर प्राथमिक आरोग्य केंद्रांनी कुटुंब कल्याण कार्यक्रम, गर्भवती, स्तनदा माता व बालकांना देण्यात येणा-या सेवा व लाभ आदी योजना गुणवत्तापूर्वक राबविल्यामुळे नांदेड जिल्हा राज्यात आघाडीवर आला आहे़

 Nanded leads the health campaign | आरोग्य अभियानात नांदेड आघाडीवर

आरोग्य अभियानात नांदेड आघाडीवर

googlenewsNext
ठळक मुद्दे मातृवंदना योजना : ३ हजार ७७५ मातांना लाभ


लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिका-यांच्या अधिपत्याखाली फेबु्रवारी २०१८ अखेर प्राथमिक आरोग्य केंद्रांनी कुटुंब कल्याण कार्यक्रम, गर्भवती, स्तनदा माता व बालकांना देण्यात येणा-या सेवा व लाभ आदी योजना गुणवत्तापूर्वक राबविल्यामुळे नांदेड जिल्हा राज्यात आघाडीवर आला आहे़
महाराष्टÑ शासनाच्या राज्य आरोग्य व कुटुंबकल्याण कार्यालय, पुणे यांच्यातर्फे दरमहा राज्यातील सर्व जिल्ह्यांची आरोग्यविषयक कार्याची प्रतवारी (रँकिंग) काढण्यात येते़ त्यानुसार झालेल्या रँकिंगमध्ये फेब्रुवारी महिन्यात नांदेड आघाडीवर आले आहे़ मातांना व बालकांना देण्यात येणा-या विविध आरोग्य विषयक योजना व सेवा प्रभावीपणे व गुणवत्तापूर्वक राबवून जिल्ह्यातील बालमृत्यू व अर्भकमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कुटुंब कल्याण व आरसीएच कार्यक्रम प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे. त्यानुसार सातत्यपूर्ण प्रयत्नांनी जिल्ह्यात आरोग्य कार्यक्रमांची गावपातळीपर्यंत प्रभावी संनियंत्रण, अंमलबजावणी व सेवा दिल्याने नांदेड जिल्हा चंद्रपूरनंतर महाराष्टÑात द्वितीय स्थानावर आला आहे. दरम्यान, आरोग्य व कुटुंब कल्याण कार्यालयाने काढलेल्या प्रतवारीनुसार फेबु्रवारी २०१८ अखेर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांनी कुटुंब कल्याण कार्यक्रम, गर्भवती, स्तनदा माता व बालकांच्या सेवा व लाभ आदींमध्ये नांदेडने उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. व्ही. आर. मेकाने यांनी सर्वांचे स्वागत केले़

आरोग्य विभाग : सुविधा पुुरविण्यात अग्रेसर
जिल्ह्याने चालू वर्षी मातांना देण्यात येणाºया सेवांमध्ये जननी सुरक्षा योजनेत ७५ टक्के लाभार्थ्यांच्या वैयक्तिक खात्यांमध्ये आॅनलाईन प्रणालीद्वारे निधी वर्ग केला आहे. तसेच नुकतीच नव्याने लागू झालेल्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेत प्रथम अपत्यावरील ३ हजार ७७५ मातांना सदर योजनेचा लाभ मिळाला आहे. तर जननी शिशू सुरक्षा कार्यक्रमांतर्गत ६ हजार ५८० गरोदर मातांची मोफत सोनोग्राफी केली आहे. तर संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाणे हे ९९ टक्के एवढे आहे. त्याचप्रमाणे लसीकरणामध्ये जिल्ह्याने विशेष मिशन इंद्रधनुष्य कार्यक्रमात ९२ टक्के बालकांना लसीकरणाचा लाभ दिला आहे.

Web Title:  Nanded leads the health campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.