अखेर भाजपला उमेदवार मिळाला, नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 'हा' नेता मैदानात...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 03:44 PM2024-10-28T15:44:10+5:302024-10-28T15:44:30+5:30

Nanded Lok Sabha By Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसोबतच नांदेड लोकसभा पोटनिवडणूक होणार आहे.

Nanded Lok Sabha By Election 2024: BJP announces candidate for Nanded Lok Sabha by-election | अखेर भाजपला उमेदवार मिळाला, नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 'हा' नेता मैदानात...

अखेर भाजपला उमेदवार मिळाला, नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 'हा' नेता मैदानात...

Nanded Lok Sabha By Election 2024 : महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उद्या अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे आतापर्यंत सर्वच पक्षांनी जवळपास आपले सर्व उमेदवार जाहीर केले आहेत. विशेष म्हणजे, या विधानसभा निवडणुकीसोबतच नांदेड लोकसभेची पोटनिवडणूकदेखील  (Nanded Loksabha byelection) होणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने नांदेडची जागा जिंकली होती. पण, काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांच्या अकाली निधनामुळे या ठिकाणी पोट निवडणूक होत आहे.

या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने वसंत चव्हाण यांचे पूत्र रवींद्र चव्हाण यांना यापूर्वीच उमेदवारी जाहीर केली आहे. तर, दुसरीकडे भाजपला नांदेडसाठी उमेदवार मिळत नव्हता. पण, आता अखेर भाजपने आपला उमेदवार जाहीर केला आहे. भाजपने नांदेड दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. संतुक हंबर्डे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. संतुक हंबर्डे हे नांदेड दक्षिण मतदारसंघाचे काँग्रेस आमदार मोहन हंबर्डे यांचे संख्ये भाऊ आहेत. आता नांदेड लोकसभेत मतदार कुणाच्या बाजूने कौल देणार, हे पाहणे महत्वाचे आहे.

काँग्रेसकडून रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी 
खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघातील जागेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसोबतच 20 नोव्हेंबर रोजी नांदेड लोकसभेच्या जागेसाठी मतदान होणार आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे. 

Web Title: Nanded Lok Sabha By Election 2024: BJP announces candidate for Nanded Lok Sabha by-election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.