VIDEO: वृद्ध वाहून जात असताना सगळे व्हिडीओ काढण्यात मग्न; वेळीच मदत न मिळाल्यानं मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 11:36 AM2021-06-13T11:36:19+5:302021-06-13T11:42:17+5:30
वृद्धाला मदतीची गरज असताना प्रत्यक्षदर्शी व्हिडीओ काढण्यात मग्न; उपस्थितांचा असंवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद
नांदेड: नाल्याच्या पुलावरून वाहणाऱ्या पाण्यातून जाणाऱ्या वृद्धाचा वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद जवळच्या खतगावमध्ये ही घटना घडलीय. विशेष म्हणजे वृद्ध वाहून जात असताना प्रत्यक्षदर्शी मात्र घटनेचा व्हिडीओ काढण्यात व्यस्त होते.
नांदेड- वृद्ध वाहून जात असताना ग्रामस्थ व्हिडीओ काढण्यात मग्न https://t.co/CbvSFUB0GJpic.twitter.com/InDyqnhzKF
— Lokmat (@MiLOKMAT) June 13, 2021
65 वर्षीय विठ्ठल माने हे शनिवारी सायंकाळी शेतातून घराकडे येत होते. खातगाव येथील पुलावर त्यावेळी गुडघ्यावर पाणी होते. पुलाच्या दोन्ही बाजूला नागरिक उभे होते. त्याचवेळी माने हे पाण्यातून मार्ग काढत पूल ओलांडण्यासाठी जात होते. परंतु अर्धा पूल पार केल्यानंतर पाण्याचा जोर अचानक वाढल्याने तोल जाऊन ते वाहून गेले. अनेकांनी या घटनेचा व्हिडीओ चित्रित केला. परंतु वृद्धांच्या मदतीसाठी कुणीच धावून गेले नाही. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. वृद्धाचा मृतदेह शेजारच्या तलावाच्या जवळ आढळून आला. या प्रकरणी संबंधित तलाठ्याने पंचनामा करत अहवाल तहसील कार्यालयास सादर केला आहे.