नांदेड - दिल्ली विमानसेवेला मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 01:03 AM2018-10-20T01:03:47+5:302018-10-20T01:04:19+5:30
केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी उडान योजनेअंतर्गत नांदेडातील विमानसेवेला पुन्हा एकदा अच्छे दिन आले आहेत़ यापूर्वी नांदेडातून मुंबई, हैदराबाद आणि अमृतसर विमानसेवा सुरु करण्यात आली आहे़ त्यात आता देशाच्या राजधानीचीही भर पडली असून येत्या १९ नोव्हेंबरपासून नांदेड-दिल्ली विमानसेवा सुरु होणार आहे़ आठवड्यातून दोन दिवस ही सेवा राहणार असून त्यामुळे दिल्लीला जाणाऱ्या भाविकांची मोठी सोय झाली आहे़ त्याचबरोबर सचखंड, जम्मूतावी या एक्स्प्रेसवरील ताणही कमी होणार आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी उडान योजनेअंतर्गत नांदेडातीलविमानसेवेला पुन्हा एकदा अच्छे दिन आले आहेत़ यापूर्वी नांदेडातून मुंबई, हैदराबाद आणि अमृतसर विमानसेवा सुरु करण्यात आली आहे़ त्यात आता देशाच्या राजधानीचीही भर पडली असून येत्या १९ नोव्हेंबरपासून नांदेड-दिल्ली विमानसेवा सुरु होणार आहे़ आठवड्यातून दोन दिवस ही सेवा राहणार असून त्यामुळे दिल्लीला जाणाऱ्या भाविकांची मोठी सोय झाली आहे़ त्याचबरोबर सचखंड, जम्मूतावी या एक्स्प्रेसवरील ताणही कमी होणार आहे़
नांदेडच्या सचखंड गुरुद्वारा येथे दर्शनासाठी देश-विदेशातून हजारो भाविक येतात़ परंतु, विमानसेवेच्या अडचणीमुळे भाविकांचीही गैरसोय होत होती़ त्यात ब-याच पाठपुराव्यानंतर नांदेडहून मुंबई, हैदराबाद आणि आता काही दिवसांपूर्वीच अमृतसर विमानसेवा सुरु करण्यात आली आहे़ या विमानसेवेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे़
परंतु, नांदेडात येणा-या भाविकांमध्ये दिल्ली, हरियाणा यासह इतर ठिकाणांहून येणाºया भाविकांची संख्याही अधिक आहे़ या भाविकांना नांदेडला येण्यासाठी रेल्वेवरच अवलंबून रहावे लागत होते़
त्यामुळे सचखंड, जम्मूतावी या गाड्यांवर त्याचा परिणाम होत होता़ प्रवाशांना वेळेवर या गाड्यांचे आरक्षणही मिळत नव्हते़ त्यामुळे नांदेडहून दिल्ली विमानसेवा सुरु करण्याची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी होती़ सण-उत्सवाच्या काळात भाविकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती़ त्यामुळे सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने सातत्याने नांदेड-दिल्ली विमानसेवेसाठी पाठपुरावा करण्यात येत होता़
त्यावर एअर इंडियाच्या वतीने १९ नोव्हेंबरपासून नांदेड-दिल्ली विमानसेवा सुरु करण्यास हिरवा कंदील दाखविला आहे़
आठवड्यात सोमवार आणि गुरुवारी ही सेवा सुरु राहणार आहे़ ही विमानसेवा सुरु झाल्यानंतर भाविकांना आता नांदेड ते दिल्ली, अमृतसर, मुंबई आणि हैदराबाद शहरांमध्ये पोहोचण्यासाठी मोठी सोय झाली आहे़ ही विमानसेवा सुरु करण्याच्या निर्णयाचे गुरुद्वारा बोर्डाने स्वागत केले आहे़