नांदेड महापालिकेचा सुधारित कर्मचारी आकृतीबंध आज होणार सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 01:03 AM2018-12-14T01:03:20+5:302018-12-14T01:03:46+5:30
महापालिकेचा बहुचर्चित कर्मचारी आकृतीबंध शुक्रवारी पुन्हा एकदा नव्याने राज्य शासनाकडे सादर होणार आहे. ३ सप्टेंबर रोजी शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आलेला कर्मचारी आकृतीबंध नव्याने सादर करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते.
नांदेड : महापालिकेचा बहुचर्चित कर्मचारी आकृतीबंध शुक्रवारी पुन्हा एकदा नव्याने राज्य शासनाकडे सादर होणार आहे. ३ सप्टेंबर रोजी शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आलेला कर्मचारी आकृतीबंध नव्याने सादर करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले होते.
महापालिकेची स्थापनेपासून मनपाचा कर्मचारी आकृतीबंध अद्याप मंजूर झाला नाही. आहे त्याच कर्मचाऱ्यावर काम भागविले जात आहे. त्यातच अनेक पदे रिक्त असल्याने कार्यरत कर्मचा-यावर कामाचा भार वाढला आहे. ३ सप्टेंबर २०१८ रोजी महापालिकेने कर्मचा-यांचा सुधारित आकृतीबंध शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला होता. त्यात सुधारणा करुन हा आकृतीबंध पाठविण्याची सूचना शासनाने महापालिकेला केली होती. त्यामुळे हा प्रस्ताव परत आला होता. पुन्हा नव्याने हा प्रस्ताव विभागवार शासनाला १४ डिसेंबर रोजी पाठविला जाणार आहे. यामुळे हा आकृतीबंध मंजूर होईल की नाही याकडे सर्व अधिकारी-कर्मचा-यांचे लक्ष लागले आहे.
दुसरीकडे महापालिका स्थापनेपासून अद्याप कर्मचारी आकृतीबंध पूर्ण न झाल्याने अनेक आवश्यक पदे भरता आली नाहीत. ३ सप्टेंबर रोजी पाठविण्यात आलेल्या आकृतीबंधात ११ नव्या पदांची निर्मिती करण्यात आली होती. आजघडीला २ हजार ३३२ अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत.
महापालिकेला पहिला कर्मचारी आकृतीबंध ५ सप्टेंबर रोजी २०१५ रोजी शासनाकडे पाठविला होता. अधिकारी- पदाधिकाºयांच्या वादातून तो मंजूर झाला नाही. शासनस्तरावर अनेक तक्रारी करण्यात आल्या. तत्कालीन महापौर आणि खा. अशोकराव चव्हाण यांनी आकृतीबंधासंदर्भात २२ जानेवारी २०१६ रोजी शासनाला पत्र देत आक्षेप नोंदविला होता.
त्यामुळे शासनाने २८ जानेवारी २०१६ रोजी महापालिकेला सुधारित आकृतीबंध सादर करण्याचे निर्देश दिले होेते. तो ३ सप्टेंबर रोजी शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला. तो आता पुन्हा विभागवार पाठविण्यात येणार आहे.