नांदेड मनपाची घंटागाडी आता आॅनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:58 AM2018-07-22T00:58:11+5:302018-07-22T00:58:30+5:30

महापालिकेच्या वतीने शहरात घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत चालविल्या जाणाऱ्या घंटागाड्यांची माहिती आॅनलाईन उपलब्ध होणार आहे. या घंटागाड्यांना जीपीएस सिस्टीम बसविण्यात आली आहे.

Nanded Municipal Garbage Now Online | नांदेड मनपाची घंटागाडी आता आॅनलाईन

नांदेड मनपाची घंटागाडी आता आॅनलाईन

Next
ठळक मुद्देजीपीएस सिस्टीमद्वारे मिळणार माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : महापालिकेच्या वतीने शहरात घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत चालविल्या जाणाऱ्या घंटागाड्यांची माहिती आॅनलाईन उपलब्ध होणार आहे. या घंटागाड्यांना जीपीएस सिस्टीम बसविण्यात आली आहे.
शहरात घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत ११९ वाहनांद्वारे कचरा उचलला जाणार आहे. कचरा उचलणारी ही वाहने नेमकी कुठे आहेत याचा शोध शहरातील नागरिकांना आॅनलाईन घेता येणार आहे. सदरील घंटागाड्यांना जीपीएस सिस्टीम कार्यान्वित करण्यात आली आहे. घंटागाड्यांचा शोध घेण्यासाठी अ‍ॅनराईड मोबाईलवर गुगल प्लेस्टोअरमधून ऋछकळफअउङ हे अ‍ॅप डाऊनलोड करावे. त्यानंतर पुढच्या पेजवर सर्व्हरनेम विचारणा करते. तेथे श्ळर हे सर्व्हरनेम टाकून कनेक्ट करावे. त्यानंतर अ‍ॅपवर युजरनेम या ठिकाणी ठअठऊएऊटउ असे व पासवर्डच्या ठिकाणी 123456 असे टाकून लॉगीन दाबा. या पेजवर चालू असलेल्या किंवा थांबलेल्या, बंद व इतर प्रकारे घंटागाडीची थेट माहिती मिळेल. तसेच डाव्या हाताच्या वरच्या बाजूस असलेल्या तीन आडव्या रेषा दाबल्यास आपणास घंटागाडीप्रमाणे ठिकाण तसेच घंटागाडीची इतर माहिती थेट मिळणार आहे. या सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा. शहरात व आपल्या घराजवळ असलेल्या कचºयाबाबतची माहिती घंटागाडीला दिल्यास शहर कचरामुक्त होईल तसेच परिसर स्वच्छ व निरोगी राहण्यास मदत होणार आहे. यातूनच नांदेड शहर हे स्वच्छ व सुंदर होईल, अशी अपेक्षाही महापालिकेकडून व्यक्त करण्यात आली आहे.
---
शहरातील सहा झोनमध्ये कचरा संकलनाचा रूटमॅपही निश्चित
घनकचरा व्यवस्थापनअंतर्गत महापालिका हद्दीतील क्षेत्रीय कार्यालय १ ते ६ मध्ये घरोघरी घनकचरा संकलन करणे, वाहतूक करणे, रस्ते झाडणे, नाली काढणे, नाल्यातील कचरा उचलणे आणि वाहतूकदारही डंपिंग ग्राऊंड येथे कचरा टाकण्याचे कामही ठेकेदारास देण्यात आले आहे. त्यानुसार महापालिका हद्दीत घरोघरी जाऊन कचरा संकलन करणे, रस्ते सफाई करणे, नाल्या सफाई करणे आदी आदेशानुसार यंत्रसामग्री उपलब्ध करण्याची जबाबदारी ठेकेदाराची आहे. त्यानुसार ठेकेदाराने यंत्रसामग्री उपलब्ध करुन दिल्यानुसार प्रभागातील स्वच्छता निरीक्षकामार्फत रुटमॅपही निश्चित करण्यात आला आहे. या रुटमॅपनुसारच यापुढे कचरा उचलण्याचे आदेश आयुक्त लहुराज माळी यांनी दिले आहेत. प्रत्येक प्रभागासाठी चार घंटागाडी आणि एक टेम्पो तसेच मागणीनुसार सायकल रिक्षा देण्यात आले आहे. त्याचवेळी प्रभागनिहाय स्वच्छता निरीक्षक व सुपरवायझरची जबाबदारी निश्चित करुन देण्यात आली आहे. स्वच्छता निरीक्षकांनी प्रभागात घरोघरी कचरा संकलन करताना सुका कचरा आणि ओला कचरा वेगळा संकलित करावा आणि नियोजित वेळापत्रकानुसारच कचरा उचलावा, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
---
वाहन तपासणीचे आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : महापालिकेच्या वतीने शहरात कचरा उचलण्यासाठी वापरण्यात येणाºया वाहनांची तपासणी करण्याचे आदेश उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी दिले आहेत.
महापालिकेच्या कचरा उचलणाºया वाहनांची नोंदणी झाली नसून अनेक अनधिकृत वाहने कचरा उचलत असल्याची तक्रार महापालिकेच्या स्थायी समिती सदस्या ज्योत्स्ना गोडबोले यांनी १७ जुलै रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे केली होती.
ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणात चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. प्रादेशिक परिवहन विभागाच्या पथक क्र. १ आणि २ मध्ये कार्यरत सर्व मोटार वाहन निरीक्षक आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांना वाहन तपासणीचे आदेश दिले आहेत. दोषी वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
कचरा संकलनाबाबत मागील काही दिवसांपासून तक्रारीत वाढ झाली आहे. या तक्रारीचे निरसन मनपाला करावे लागणार आहे.

Web Title: Nanded Municipal Garbage Now Online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.