नांदेड येथील खून प्रकरणात दोघे दोषी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 01:21 AM2017-11-30T01:21:06+5:302017-11-30T01:21:17+5:30

नांदेड : किरकोळ कारणावरुन चंदासिंग कॉर्नर परिसरात २०१३ मध्ये चाकूने भोसकून तरुणाचा खून केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने दोघांना दोषी ठरविले आहे़ या प्रकरणात गुरुवारी न्यायालय शिक्षा सुनावणार आहे़

Nanded murder case: Both guilty | नांदेड येथील खून प्रकरणात दोघे दोषी

नांदेड येथील खून प्रकरणात दोघे दोषी

googlenewsNext
ठळक मुद्देचंदासिंग कॉर्नर परिसरात झाला होता युवकाचा खून


लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : किरकोळ कारणावरुन चंदासिंग कॉर्नर परिसरात २०१३ मध्ये चाकूने भोसकून तरुणाचा खून केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने दोघांना दोषी ठरविले आहे़ या प्रकरणात गुरुवारी न्यायालय शिक्षा सुनावणार आहे़
मोहम्मद आवेज ऊर्फ चिंग्या रा़बळीरामपूर व बालाजी यादव हे दोघे जण २७ डिसेंबर २०१३ रोजी चंदासिंग कॉर्नर परिसरात पद्मावती बारमध्ये बसले होते़ रात्री सात वाजेच्या सुमारास हे दोघेही जण बारच्या बाहेर पडले़ त्यानंतर मोहम्मद आवेज हा लघूशंकेसाठी बसस्टँडमधील गल्लीत गेला़ तर बालाजी यादव हा रस्त्याच्या कडेला उभा होता़ यावेळी सुनील ऊर्फ सुन्या गंगाधर कोकाटे, विजय मधुकर ढगे, प्रभाकर नामदेव येडे, सत्यम व्यंकटराव हत्ते व सुनील भगवानराव सूर्यवंशी हे पाच जण त्या ठिकाणी आले़ यावेळी सुनील कोकाटे याने मोहम्मद आवेज याच्याशी वाद घातला़ त्यानंतर मोहम्मद आवेज याला खाली पाडून त्याच्या छातीवर बसून वार केले़ त्यानंतर सत्यम हत्ते यानेही आवेज याच्या छातीवर बसून चाकूने वार केले़
घटनास्थळीच मोहम्मद आवेज याचा मृत्यू झाला़ हा सर्व प्रकार बालाजी यादव हा समोरुन पाहत होता़ यावेळी यादवने घटनास्थळावरुन पळ काढून नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे गाठले़ या प्रकरणात बालाजी यादव याच्या तक्रारीवरुन पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला़ होता़ तत्कालीन पोनि़ श्रीधर पवार यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते़
सरकार पक्षाच्या वतीने एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले़ यामध्ये बालाजी यादव याची साक्ष महत्वाची ठरली़
या प्रकरणात आरोपी सुनील ऊर्फ सुन्या गंगाधर कोकाटे व सत्यम व्यंकटराव हत्ते या दोघांना पाचवे जिल्हा न्या़एच़आऱ वाघमारे यांनी दोषी ठरविले आहे़ तर उर्वरित तिघांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे़ दोषींना गुरुवारी शिक्षा सुनावण्यात येणार आहे़ सरकार पक्षाच्या वतीने मुख्य सरकारी वकील अ‍ॅड़अमरिकसिंघ वासरीकर यांनी बाजू मांडली़

Web Title: Nanded murder case: Both guilty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.