नांदेडातून हज विमानसेवा गरजेची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 12:33 AM2018-04-09T00:33:42+5:302018-04-09T00:33:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : नांदेडसह परभणी, हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यातून हज यात्रेला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असून नांदेड येथून हज विमानसेवा सुरू झाली पाहिजे़ यासाठी संबंधित यंत्रणेनी केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांनी केले़
नांदेड येथील मुख्य पोस्ट कार्यालयात नव्याने सुरू करण्यात आलेल्या पासपोर्ट सेवा केंद्राच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते़ प्रारंभी खा़ चव्हाण व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले़
मंचावर पुणे येथील क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी अनंत ताकवाले, औरंगाबाद क्षेत्राचे पोस्टमास्तर जनरल प्रणवकुमार, जिल्हाधिकारी अरूण डोंगरे, विदेश मंत्रालयाचे संयुक्त सचिव मनीष गु्प्ता, जि़ प़ अध्यक्षा शांताबाई पवार, उपमहापौर विनय गिरडे आदींची प्रमुख उपस्थिती होती़
खा़ अशोकराव चव्हाण म्हणाले, नांदेड येथे पासपोर्ट सेवा केंद्र सुरू झाल्याने शिक्षण, पर्यटन, व्यापार, नौकरीनिमित्त विदेशात जाणाºयांना वेळेत सेवा मिळेल़ नांदेड येथून हज यात्रेसाठी विमानसेवा सुरू झाली पाहिजे़ त्यासाठी लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले़ तसेच पासपोर्ट कार्यालयाची इमारत जुनी झाली असून नवीन इमारतीसाठी केंद्राने निधी उपलब्ध करून द्यावा, असे ते म्हणाले़ येणाºया काळात पोस्ट कार्यालयातून बँकीग सुविधा उपलब्ध मिळणार आहे़ त्यामुळे हे केंद्र निश्चित नफा देणारे केंद्र होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला़
पोस्टमास्तर जनरल प्रणवकुमार म्हणाले, मिनिस्ट्री आॅफ एक्स्ट्रनल अफेअरसोबत करार झाल्यामुळे पासपोर्ट सुविधा उपलब्ध करून देता आली़ त्यामुळे नांदेडसह परभणी, हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांना आता पुणे, नागपूर येथे जाण्याची आवश्यकता नाही़
शहरातक्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी अनंत ताकवाले म्हणाले, लोकाभिमुख प्रशासनासाठी आमचा प्रयत्न असून जनसेवेसाठी सुरू केलेल्या या केंद्राचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले़
नांदेडचे पालकमंत्री रामदास कदम यांच्यासह खा़राजीव सातव, खा़सुनील गायकवाड , आणि स्थानिक आमदारांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरविली