अचानक वाढलेल्या थंडीने नांदेड जिल्ह्यात एकाचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 12:08 PM2019-01-29T12:08:49+5:302019-01-29T12:10:27+5:30
ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात एका अज्ञात भिकाऱ्याचा गारठून मृत्यू झाला.
उमरी (जि. नांदेड) : अचानक वाढलेल्या थंडीने नांदेड जिल्ह्यात एकाचा बळी घेतला. येथील ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात एका अज्ञात भिकाऱ्याचा गारठून मृत्यू झाला.
सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. सुमारे साठ वर्षे वयाचा हा भिकारी असावा. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. उमरी येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. याप्रकरणी उमरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
मराठवाडा गारठला
मराठवाड्यात सोमवारी सर्वात कमी ९ अंश सेल्सिअस तापमान बीडमध्ये नोंदविण्यात आले. औरंगाबाद १०, लातूर ११, उस्मानाबाद ११.७, तर नांदेड, परभणीत १३ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले.