नांदेड-पनवेल रेल्वेगाडी तात्पुरती औरंगाबाद, मनमाड मार्गे धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 07:12 PM2021-03-17T19:12:35+5:302021-03-17T19:12:55+5:30

प्रवाशांच्या आग्रहाखातर नांदेड-पनवेल-नांदेड विशेष गाडी रद्द केलेल्या कालावधीत आठवड्यातून चार दिवस (सोमवारी, बुधवारी, गुरुवारी आणि शनिवारी ) तिचा नियमित मार्ग बदलून परभणी, औरंगाबाद-मनमाड मार्गे धावेल

The Nanded-Panvel train will temporarily run via Aurangabad, Manmad | नांदेड-पनवेल रेल्वेगाडी तात्पुरती औरंगाबाद, मनमाड मार्गे धावणार

नांदेड-पनवेल रेल्वेगाडी तात्पुरती औरंगाबाद, मनमाड मार्गे धावणार

googlenewsNext

नांदेड : सोलापूर विभाग, मध्य रेल्वेमधील भाळवणी ते भिगवण या रेल्वे स्थानकांदरम्यान दुहेरीकरणाचे काम तसेच इतर तांत्रिक कार्य करण्याकरिता नॉन-इंटरलॉक ब्लॉक घेण्यात आला आहे.

या ब्लॉकमुळे गाडी संख्या ०७६१४/०७६१३ नांदेड-पनवेल-नांदेड या विशेष मार्गे परळी, लातूर या गाडीच्या १८ फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या; परंतु प्रवाशांच्या आग्रहाखातर नांदेड-पनवेल-नांदेड विशेष गाडी रद्द केलेल्या कालावधीत आठवड्यातून चार दिवस (सोमवारी, बुधवारी, गुरुवारी आणि शनिवारी ) तिचा नियमित मार्ग बदलून परभणी, औरंगाबाद-मनमाड मार्गे धावेल, असे रेल्वेतर्फे कळविण्यात आले आहे.

मार्ग बदलून धावणाऱ्या गाड्या याप्रमाणे, गाडी संख्या ०७६१४ नांदेड ते पवनेल विशेष गाडी दिनांक १८, २०, २२, २४, २५, २७, २९ आणि ३१ मार्च रोजी परळी, लातूर, कुर्डूवाडीमार्गे न धावता मार्ग बदलून परभणी-१८.५०, सेलू-१९.३१, परतूर-१९.५१, जालना-२०.३२, औरंगाबाद -२२.०५, मनमाड-०१.३५ कोपरगाव-०३.०७ , पुणे-०९.३० मार्गे धावून पनवेल येथे १२.३० वाजता पोहोचेल,

तर गाडी संख्या ०७६१३ पनवेल ते नांदेड विशेष गाडी दि. १९, २१, २३, २५, २६, २८ आणि ३० मार्च २०२१ रोजी पनवेल येथून १६.०० वाजता सुटून लातूर, परळी मार्गे न धावता तिचा मार्ग बदलून पुणे-१९.३०, कोपरगाव- ०२.०२, मनमाड-०४.१०, औरंगाबाद-०६.१५, जालना-०७.०२, परतूर-०७.३१, सेलू-०७.५१, परभणी-०८.४७, पूर्णा ०९.२० मार्गे नांदेड येथे सकाळी ११.०० वाजता पोहोचेल.

Web Title: The Nanded-Panvel train will temporarily run via Aurangabad, Manmad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.