नांदेड पोलिसांची कारवाई महसूलच्या जिव्हारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 12:45 AM2018-04-05T00:45:37+5:302018-04-05T00:45:37+5:30

गोदावरी नदी जिल्ह्यासाठी जीवनदायिनी आहे़ मात्र अमाप वाळू उपसा करुन नदीपात्राची सध्या अपरिमित हानी करण्यात येत आहे़ त्यामुळे पर्यावरणाचा -हास होत असून पाणीटंचाईची भीषण समस्याही दरवर्षी निर्माण होत आहे़ केवळ ३१ कोटींच्या महसुलापोटी प्रशासनाला ३८ घाटांचे नखरे सहन करावे लागत आहेत़ परंतु या अमर्याद वाळू उपशामुळे दरवर्षी पाणीटंचाई आराखड्यावर त्यापेक्षा दुप्पट रक्कम खर्ची पडत आहे़ विशेष म्हणजे, अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी नावालाच दोन पथके नियुक्त करण्यात आली आहेत़

Nanded police action recovered revenue | नांदेड पोलिसांची कारवाई महसूलच्या जिव्हारी

नांदेड पोलिसांची कारवाई महसूलच्या जिव्हारी

googlenewsNext
ठळक मुद्देवाळूचा बेसुमार उपसा : कारवाईसाठी मात्र केवळ दोन पथकांची स्थापना

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : गोदावरी नदी जिल्ह्यासाठी जीवनदायिनी आहे़ मात्र अमाप वाळू उपसा करुन नदीपात्राची सध्या अपरिमित हानी करण्यात येत आहे़ त्यामुळे पर्यावरणाचा -हास होत असून पाणीटंचाईची भीषण समस्याही दरवर्षी निर्माण होत आहे़ केवळ ३१ कोटींच्या महसुलापोटी प्रशासनाला ३८ घाटांचे नखरे सहन करावे लागत आहेत़ परंतु या अमर्याद वाळू उपशामुळे दरवर्षी पाणीटंचाई आराखड्यावर त्यापेक्षा दुप्पट रक्कम खर्ची पडत आहे़ विशेष म्हणजे, अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी नावालाच दोन पथके नियुक्त करण्यात आली आहेत़
काही हजार ब्रास वाळू काढण्याचा ठेका घेवून सर्रासपणे लाखो ब्रास वाळू उपसा करुन नदीपात्रांची अक्षरश: लूट करण्यात येत आहे़ महसूल विभागाच्या आशीर्वादाशिवाय हा प्रकार होणे अशक्यच आहे़ यंदा राज्यात अनेक ठिकाणी रेती उपशाला परवानगी मिळाली नाही़ त्यामुळे वाळू माफियांचे सर्व लक्ष नांदेड जिल्ह्याकडे केंद्रित झाले़ वाळूला सोन्यासारखा भाव आला़
त्यामुळे राजकीय पुढाऱ्यांच्या टोळ्याही नदीपात्रात उतरल्या़ तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी अशा अधिकाºयांची मोठी फौज असताना, पोलिसांना या घाटांवर कारवाई करावी लागत आहे यातच सर्व आले़ सहाय्यक पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी दोन वाळू घाटांवर धाड मारत ९ जेसीबी, २२ ट्रक आणि १० हजार ब्रास वाळू जप्त केली़ त्यानंतर सोमवारी नायगाव तालुक्यातील सातेगाव येथे १० जेसीबी, २७ ट्रक, १ लाख ब्रास वाळू जप्त केली़ त्यांच्या या कारवाईने वाळू माफीयांचे कंबरडे मोडले असताना महसूल प्रशासन मात्र अद्यापही जागचे हलण्यास तयार नाही़ नुरुल हसन यांच्या कारवाई विरोधात वाळू ठेकेदार मात्र एक झाले़ त्यांनी जिल्हाधिकाºयांकडेही धाव घेतली़ परंतु त्यानंतर नुरुल हसन यांनी वाळू माफियांच्या विरोधात मोहीम तीव्र करण्याचा इशारा दिला़ त्यामुळे वाळू माफियांच्या विरोधात सुरु असलेली पोलिसांची कारवाई महसूलच्या मात्र जिव्हारी लागली आहे़

वाळू उपसा रोखण्यासाठी पथके
४याबाबत जिल्हाधिकारी अरुण डोंगरे म्हणाले, अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी जिल्ह्यात दोन पथकांची स्थापना करण्यात आली आहे़ या पथकाद्वारे अशा प्रकारचा वाळू उपसा रोखण्यासाठी कारवाई केली जात आहे़ आवश्यक त्या ठिकाणी पोलिसांचीही मदत घेतली जात आहे़

Web Title: Nanded police action recovered revenue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.