गर्भपात, प्रेताची विल्हेवाट प्रकरणी नांदेड एसपींनी मागविला मनाठा पोलिसांकडून लेखी खुलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:55 AM2018-04-25T00:55:49+5:302018-04-25T00:55:49+5:30

तालुक्यातील धन्याची वाडी येथील अल्पवयीन मुलीचा गर्भपातानंतर झालेला मृत्यू आणि तिच्या मृतदेहाची परस्पर लावण्यात आलेल्या विल्हेवाटचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच पोलीस दलात खळबळ उडाली. पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी या वृत्ताची दखल घेत मनाठा पोलिसांकडून लेखी खुलासा मागविला आहे.

Nanded SP seeks explanation in miscarriage, murder case | गर्भपात, प्रेताची विल्हेवाट प्रकरणी नांदेड एसपींनी मागविला मनाठा पोलिसांकडून लेखी खुलासा

गर्भपात, प्रेताची विल्हेवाट प्रकरणी नांदेड एसपींनी मागविला मनाठा पोलिसांकडून लेखी खुलासा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हदगाव : तालुक्यातील धन्याची वाडी येथील अल्पवयीन मुलीचा गर्भपातानंतर झालेला मृत्यू आणि तिच्या मृतदेहाची परस्पर लावण्यात आलेल्या विल्हेवाटचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच पोलीस दलात खळबळ उडाली. पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी या वृत्ताची दखल घेत मनाठा पोलिसांकडून लेखी खुलासा मागविला आहे.
दरम्यान, प्रकरण जुने आहे, असे म्हणत धन्याची वाडी येथील सरपंच साहेबराव डवरे यांनी सावरासावर करण्याचा प्रयत्न केला. मनाठा पोलीस ठाण्यातंर्गत धन्याची वाडी गाव येते. मनाठा पोलिसांनी मंगळवारी सकाळी गावाला भेट देव्ऊन संबंधितांचा जाबजबाब घेण्याचा प्रयत्न केला, मात्र मयत मुलीचे आई-वडील गाव सोडून गेल्याने पोलीस रिकाम्या हाताने परतले. आरोपी कोण आहे, हे पोलिसांना माहिती आहे, मात्र फिर्याद नाही, या एका सबबीखाली पोलीस गुन्हा नोंदवून तपास करण्यास टाळाटाळ करीत आहेत.
या प्रकरणाची गावातील अन्य काही प्रतिष्ठित व्यक्तींनाही माहिती होती, एवढेच काय एखाद्या गुन्हा प्रकरणात मदत करण्यासाठी गावात नेमलेल्या एका व्यक्तीनेही या घटनेची माहिती दडवून आरोपींना सहकार्य केल्याचा आरोप गावात उघडपणे केला जात आहे. मुख्य आरोपी आजही मोकाट आहे. ज्या पुरुषासोबत मुलीचा संबंध होते तो आणि खरटवाडी येथील एका महिलेने गर्भपात करण्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे, ती महिलाही मोकाट आहे. आंध्र प्रदेशातील औषधींचा वापर करुन ही महिला गर्भपात करण्याचे काम बिनदिक्कत करीत असते, असा आरोप आहे.
दरम्यान, पोलीस अधीक्षकांनी ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत मनाठा पोलिसांना नोटिसवजा पत्र पाठवून या प्रकरणाचा खुलासा मागविला आहे. पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारल्यास संपूर्ण प्रकरण उघडकीस येण्यास वेळ लागणार नाही, मयत मुलीलाही न्याय मिळेल, अशी धन्याची वाडी गावात चर्चा आहे.या प्रकरणी आरोपीपर्यंत पोहोचण्याचे पोलिसांसमोर आव्हान असून पोलीस काय तपास करतात, याकडे लक्ष लागले आहे.

नांदेड एसपींनी मागविला मनाठा पोलिसांकडून लेखी खुलासा
‘लोकमत’चा दणका : गर्भपात, प्रेताची विल्हेवाट प्रकरणी

Web Title: Nanded SP seeks explanation in miscarriage, murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.