नांदेड-तांडूर आणि तांडूर-परभणी विशेष एक्स्प्रेस धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:15 AM2020-12-26T04:15:10+5:302020-12-26T04:15:10+5:30
गाडी क्र ०७६८१ नांदेड- तांडूर विशेष एक्सप्रेस १० जानेवारीपासून गाडी संख्या ०७६८१ नांदेड- तांडूर विशेष एक्सप्रेस धावणार आहे. ...
गाडी क्र ०७६८१ नांदेड- तांडूर विशेष एक्सप्रेस १० जानेवारीपासून गाडी संख्या ०७६८१ नांदेड- तांडूर विशेष एक्सप्रेस धावणार आहे. हि गाडी हुजूर साहिब नांदेड येथून रोज रात्री १०.५० ला सुटेल आणि निझामाबाद मार्गे सिकंदरबादला सकाळी ५.२० ला पोहोचेल. पुढे बेगमपेठ, लिंगमपल्ली, विकाराबाद मार्गे तांडूर येथे सकाळी ८.१० ला पोहोचेल. ही गाडी हैदराबाद ला जाणार नाही.
गाडी क्र ०७६८२ तांडूर -परभणी विशेष एक्सप्रेस ११ जानेवारीपासून गाडी संख्या ०७६८२ तांडूर -परभणी विशेष एक्सप्रेस धावणार आहे. ही गाडी तांडूर येथून रोज रात्री ७.४० ला सुटेल. पुढे विकाराबाद, लिंगमपल्ली, बेगमपेठ मार्गे सिकंदरबाद येथे रात्री १०.०५ वाजता पोहोचेल. सिकंदराबाद येथून रात्री १०.१५ वाजता निघून निझामाबाद मार्गे हुजूर साहिब नांदेड येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ४.५८ मार्गे परभणी येथे ६.३५ ला पोहोचणार आहे.
रेल्वे बोर्डाने मान्य केल्यानुसार गाडी संख्या ५७५१२ परभणी-नांदेड सवारी गाडी १२ जानेवारीपासून गाडी क्र. ०७६६५ परभणी-नांदेड विशेष एक्सप्रेस मध्ये परिवर्तीत होऊन धावणार आहे. गाडी क्र ०७६६५ परभणी-नांदेड एक्सप्रेस परभणी येथून सकाळी ९.४० ला सुटेल. पूर्णा १०.१० वाजता मार्गे हु.सा. नांदेड येथे ११.२५ ला पोहोचेल. या तीनही रेल्वे गाड्यांत १ द्वितीय श्रेणी वातानुकुलीत(ए.सी. टू टायर), ०१ तृतीय वातानुकुलीत(ए.सी.थ्री टायर), ९ द्वितीय शय्या (स्लीपर कोच), २ जनरल आणि २ एस.एल.आर. असे एकूण १५ डब्बे राहणार आहेत. तसेच तीनही रेल्वे गाड्यां पूर्ण आरक्षित आहेत. या बदलामुळे १२ सप्टेंबरपासून सुरु असलेली गाडी संख्या ०७५६४ /०७५६३ परभणी – हैदराबाद – परभणी हि विशेष एक्स्प्रेस धावणार नाही.