वृक्षलागवडीमध्ये नांदेड राज्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 06:02 PM2018-08-01T18:02:25+5:302018-08-01T18:05:02+5:30

शासनाच्यावतीने राबविण्यात आलेल्या १३ कोटी वृक्ष लागवड उपक्रमात नांदेड जिल्हा राज्यात अव्वल ठरला असून सर्वाधिक ८२ लाख २६ हजार वृक्षांची लागवड येथे झाली आहे़  

Nanded topped the tree in the woods | वृक्षलागवडीमध्ये नांदेड राज्यात अव्वल

वृक्षलागवडीमध्ये नांदेड राज्यात अव्वल

Next
ठळक मुद्देनांदेड जिल्ह्याला ६० लाख २० हजार ६८९ रोपांचे उद्दिष्ट होते़.जिल्ह्यात ८२ लाखांहून अधिक वृक्षलागवड झाली

- श्रीनिवास भोसले 
नांदेड :  शासनाच्यावतीने राबविण्यात आलेल्या १३ कोटी वृक्ष लागवड उपक्रमात नांदेड जिल्हा राज्यात अव्वल ठरला असून सर्वाधिक ८२ लाख २६ हजार वृक्षांची लागवड येथे झाली आहे़  

शासनाच्यावतीने राज्यभरात १३ कोटी वृक्ष लागवडीचा निश्चय केला आहे़ त्यानूसार नांदेड जिल्ह्याला ६० लाख २० हजार ६८९ रोपांचे उद्दिष्ट दिले होते़ जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या जमिनी आणि रोपांची संख्या प्रस्तावित करून विविध विभागांना उद्दिष्ट दिले होते़  नांदेड वनविभागाच्यावतीने १ कोटी ७३ लाख ३५ हजार रोपे तयार करून  मराठवाड्यात सर्वाधिक वृक्ष लागवड करण्याचा निर्धार केला होता़ त्यादृष्टीने १ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत वनविभाग, जिल्हा प्रशासन, सामाजिक वनिकरण, जिल्हा परिषद, ग्रामपंचायती आदी विभागाच्या सहकार्याने आणि सेवाभावी संस्थांच्या पुढाकाराने जिल्ह्यात  ८२ लाखांहून अधिक वृक्षलागवड झाल्याचे नांदेडचे उपवनसंरक्षक अशिष ठाकरे यांनी सांगितले़

नांदेड पाठोपाठ नाशिक
वृक्षलागवडीत नांदेड अव्वलस्थानी असून नांदेड पाठोपाठ नाशिक जिल्हा असून त्याठिकाणी  ७१ लाख ५६ हजार ०५० वृक्षलागवड झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ६६ लाख ५६ हजार ४४३  रोपांची लागवड करण्यात आली आहे़  

सीडबॉल्सचा नांदेड पॅटर्न
नांदेड सोशल ग्रुपने यंदा सीडबॉल्सच्या माध्यमातून वृक्षलागवड करण्यासाठी पुढाकार घेतला़ त्यासाठी दोन गावांची निवड करून तेथे हजारो सीडबॉल्सची लागवड केली असून बहुतांश सीडबॉल्सला अंकुर फुटले आहेत. 

Web Title: Nanded topped the tree in the woods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.