नांदेडमध्ये आदिवासींचा एल्गार! जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 05:03 AM2017-12-01T05:03:55+5:302017-12-01T05:04:10+5:30

राज्यात मन्नेरवारलू, कोळी महादेव, मल्हार कोळी, टोकरे कोळी आदी अनुसूचित जमातीवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात अन्यायग्रस्त मूळ आदिवासी समन्वय समितीच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.

 Nanded tribals Elgar! Grand Front on Collectorate's Office |  नांदेडमध्ये आदिवासींचा एल्गार! जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

 नांदेडमध्ये आदिवासींचा एल्गार! जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

googlenewsNext

नांदेड : राज्यात मन्नेरवारलू, कोळी महादेव, मल्हार कोळी, टोकरे कोळी आदी अनुसूचित जमातीवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात अन्यायग्रस्त मूळ आदिवासी समन्वय समितीच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.
शहरातील नवामोंढा मैदानापासून दुपारी अडीचच्या सुमारास मोर्चाला प्रारंभ झाला. जिल्हाभरातून मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. महिलांचाही सहभाग लक्षणीय होता. महात्मा फुले पुतळा आयटीआय, शिवाजीनगर, कलामंदिर, शिवाजी महाराज पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकला.
आदिवासी मन्नेरवारलू, कोळी महादेव, मल्हार कोळी, टोकरे कोळी आदी जमातीस अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात आला. मात्र आदिवासी विकास विभागाने १ जुलै २०१६ रोजीच्या शासन निर्णयानुसार विशेष चौकशी समिती स्थापन केली. ही विशेष चौकशी समिती रद्द करावी अशी मागणी या वेळी करण्यात आली. जात वैधता प्रमाणपत्र समितीची जिल्हा निहाय स्थापना करावी, मागील पाच वर्षांपासून बंद असलेले जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे, रक्ताच्या नात्यातील व्यक्तींना वैधता प्रमाणपत्र देण्याच्या शासन निर्णयातून अनुसूचित जमातीला वगळण्यात आले आहे. तो निर्णय अनुसूचित जमातीला लागू करावा, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीवर अध्यक्ष म्हणून उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करावी आदी मागण्या जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात मोर्चेकºयांनी केल्या आहेत.
या मोर्चाचे नेतृत्व माजी मंत्री दशरथ भांडे, समन्वय समितीचे अध्यक्ष सुरेश अंबुलगेकर, कार्याध्यक्ष परमेश्वर गोणारे आदींनी केले.

‘तो’ निर्णय लागू करावा

जात वैधता प्रमाणपत्र समितीची जिल्हा निहाय स्थापना करावी, मागील पाच वर्षांपासून बंद असलेले जात वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे, रक्ताच्या नात्यातील व्यक्तींना वैधता प्रमाणपत्र देण्याच्या शासन निर्णयातून अनुसूचित जमातीला वगळण्यात आले आहे. तो निर्णय अनुसूचित जमातीला लागू करावा आदी मागण्या या वेळी मोर्चेकºयांनी केल्या.

अनुसूचित जमातीमधील जातीवर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ अन्यायग्रस्त मूळ आदिवासी समन्वय समितीच्या वतीने गुरुवारी नांदेडमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला. नवा मोंढा येथे मोर्चाच्या प्रसंगी घेतलेले छायाचित्र.

Web Title:  Nanded tribals Elgar! Grand Front on Collectorate's Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.