नांदेड- वाघाळा महापालिकेत मोठ्या आघाडीसह कॉंग्रेस सुसाट, सर्व विरोधक पिछाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 01:26 PM2017-10-12T13:26:44+5:302017-10-12T13:37:19+5:30
संपूर्ण राज्याचे लक्ष वेढलेल्या नांदेड-वाघाळा महापालिकेच्या मतमोजणीत कॉंग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. ताज्या निकालानुसार २२ ठिकाणी कॉंग्रेस विजयी झाले आहे तर भाजपला केवळ एका जागेवर विजय मिळवत आला आहे.
नांदेड, दि. १२ : संपूर्ण राज्याचे लक्ष वेढलेल्या नांदेड-वाघाळा महापालिकेच्या मतमोजणीत कॉंग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. ताज्या निकालानुसार २२ ठिकाणी कॉंग्रेस विजयी झाले आहे तर भाजपला केवळ एका जागेवर विजय मिळवत आला आहे. यामुळे मोठ्या आघाडीसह कॉंग्रेस सुसाट पुढे जात असून सर्व विरोधक पिछाडीवर पडल्याचे चित्र दिसत आहे.
देशाध्यक्ष अशोक चव्हाण विरुद्ध सारे अशी रंगरदार लढत झालेल्या या निवडणुकीत सर्वच पक्षांनी सत्ता स्थापनेचा दावा केला होता. परंतु, निकालात सुरुवातीपासूनच कॉंग्रेसने मोठी आघाडी घेत मोठी मुसंडी मारत विजयाच्या दिशेने सुसाट वाटचाल सुरु केली आहे. याप्रमाणात भाजप, शिवसेना व एमआयएम यांचा कुठेच निभाव लागला नाही असेच चित्र दिसत आहे. सत्ता मिळवण्याचा दावा केलेल्या भाजपची पिछेहाट दिसत आहे.
६० टक्के मतदान झाले होते
नांदेड महापालिकेसाठी बुधवारी ६० टक्के मतदान झाले होते. महापालिका स्थापन झाल्यापासून नांदेडमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. एकूण २० प्रभागांतील ८१ जागांसाठी मतदान झाले. या निवडणुकीत ५७८ उमेदवार आपले नशीब आजमवत आहेत. एकूण ३ लाख ९६ हजार ८७२ मतदार होते, त्यांच्यासाठी ५५० मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती.
व्हीव्हीपीएटी मशीनवरील प्रिंटचीही होणार मोजणी
काल नांदेडमधील प्रभाग क्रमांक दोनमध्ये मतदानासाठी व्हीव्हीपॅट मशीन वापरण्यात आल्या होत्या. एकूण ३७ मशीन होत्या. त्यातील ६ बंद झाल्याने नेहमीच्या इव्हीएमवरवर मतदान घेण्यात आले होते. आज केवळ ३१ व्हीव्हीपॅट मशीनवरील मोजणी होत आहे. व्हीव्हीपीएटी मशीन वर ज्या प्रिंट निघाल्या त्यांची मोजणी देखील होणार आहे. निवडणूक आयोगाने तशी परवानगी दिली आहे. याचा अर्थ मशीनवर झालेले मतदान आणि ट्रे मध्ये असलेल्या प्रिंट तपासल्या जातील. हि मोजणी सर्वात शेवटी होईल.
ताजा निकाल : एकूण जागा 81
पक्ष विजय आघाडी
काँग्रेस 24 20
भाजपा 1 01
शिवसेना 00 01
एमआयएम 00 00
राकाँ 00 00
इतर 00 00
अपक्ष 00 00