नांदेड तापले ! पारा @ ४२ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 12:39 AM2018-04-02T00:39:48+5:302018-04-02T00:39:48+5:30
एप्रिल महिना उजाडताच वाढत्या तापमानाने आपले रौद्र रूप दाखविण्यास सुरूवात केली असून महिन्याच्या पहिल्याच दिवशी ४२ डिग्री सेल्सीअस तापमानाची नोंद झाल्याची माहिती आहे. दरम्यान, पुढील सहा दिवस तापमानाचा पारा चढताच राहणार असल्याने उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : एप्रिल महिना उजाडताच वाढत्या तापमानाने आपले रौद्र रूप दाखविण्यास सुरूवात केली असून महिन्याच्या पहिल्याच दिवशी ४२ डिग्री सेल्सीअस तापमानाची नोंद झाल्याची माहिती आहे. दरम्यान, पुढील सहा दिवस तापमानाचा पारा चढताच राहणार असल्याने उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
राज्य आरोग्य विभागाने नांदेड, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, जळगाव व भंडारा या जिल्ह्यांतील तापमानात वाढ होणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे या ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तविली असल्याने जिल्हा प्रशासनास प्रतिबंधात्मक उपाय करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
त्याचप्रमाणे उष्माघातापासून बचाव करण्यासाठी उपाययोजना, जनजागृती मोहीम आणि आपतकालीन स्थितीपासून बचाव करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचनाही संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. मागील वर्षी नांदेड जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा नागरिकांना त्रास सहन करावा लागला होता. यावर्षी प्रशासनाच्या वतीने यावर प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. उष्माघात झालेल्या रूग्णांना आरोग्यसेवा देण्यासाठी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण, रूग्णांवर प्रथमोपचार करण्यासाठी जनजागृती तसेच मनपा कार्यक्षेत्रातील आरोग्य विभागास प्रतिबंधात्मक प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या असून उन्हापासून बचाव करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
उष्माघात कक्ष स्थापन करणार
४जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा रूग्णालये व ग्रामीण रूग्णालयांत उष्माघात कक्ष स्थापन करणे तसेच राष्टÑीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत रूग्णवाहिका व पथकांची स्थापना करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे.
४दरम्यान, उष्माघाताचा त्रास जाणवत असलेल्यांनी तात्काळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते उपचार घ्यावेत, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.