नांदेडात दुर्गा विसर्जनस्थळात मनपाने केला बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 12:43 AM2018-10-18T00:43:20+5:302018-10-18T00:43:55+5:30
दरवर्षी गोदावरी आणि आसना नदीच्या विविध घाटांवर दुर्गादेवी विसर्जनाचे नियोजन करण्यात येते़ परंतु, यंदा पाणीटंचाई लक्षात घेता महापालिकेने विसर्जन स्थळात बदल केला आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : दरवर्षी गोदावरी आणि आसना नदीच्या विविध घाटांवर दुर्गादेवी विसर्जनाचे नियोजन करण्यात येते़ परंतु, यंदा पाणीटंचाई लक्षात घेता महापालिकेने विसर्जन स्थळात बदल केला आहे़
दुर्गादेवी विसर्जनासाठी दरवर्षी गोदावरी आणि आसना नदीच्या घाटांवर महापालिकेकडून नियोजन करण्यात येते़ त्यासाठी यंत्रणा कामाला लागते़ परंतु, यंदा पाणीटंचाईची भीषण समस्या निर्माण झाली आहे़
नदीघाटावर पाण्याची कमतरता आहे़ त्यामुळे नावघाट व विष्णूपुरी येथे दुर्गा विसर्जनासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे़ त्यामुळे दुर्गा मंडळांनी नावघाट आणि विष्णूपुरी येथील काळेश्वर येथे दुर्गा विसर्जनासाठी यावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे़
दरम्यान, दुर्गादेवी विसर्जन आणि हल्लाबोलनिमित्त शुक्रवार १९ आॅक्टोबर व २० आॅक्टोबर रोजी शहरातील विविध भागातून मिरवणुका निघणार असून त्यानिमित्त वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे़
तरोडा नाका ते वजिराबाद चौक मार्ग असर्जनपर्यंत डावी बाजूपणे बंद राहील़ आयटीआय चौक, साठे चौक मार्गे यात्री निवास पोलीस चौकीपर्यंत डावी बाजू पूर्णपणे बंद राहील़
यात्री निवास पोलीस चौकी ते जुना मोंढा बर्की चौक (एकमार्गी रस्ता असल्याने ये-जा करण्यासाठी) बंद राहील़
सिडको-हडको तसेच लातूर फाटा भागातून नांदेड शहराकडे नावघाट पुलावरुन इतवारा भागात व नवीन पुलावरुन जुना मोंढा भागात येणारी वाहतूक बंद राहील़ वाहनधारकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे़
हे असतील पर्यायी मार्ग
तरोडा नाका ते वजिराबाद चौक मार्ग असर्जनपर्यंत उजवी बाजू पूर्णपणे जाण्या-येण्यासाठी चालू राहील़ आयटीआय चौक-साठे चौक मार्गे यात्री निवास पोलीस चौकीपर्यंत उजवी बाजू सुरु राहील़ यात्रीनिवास पोलीस चौकी ते जुना मोंढा बर्की चौक मार्गावरील वाहतूक महम्मद अली रोड किंवा धाय मार्केट, वाटमारी रोड, बर्की चौक ते लोहार गल्ली, भगतसिंघ चौक, अबचलनगर, यात्री निवास चौकी किंवा बाफना टी पॉर्इंट व पुढे जाण्या-येण्यासाठी सुरु राहील़ लातूर फाटा, सिडको, हडको, ढवळे कॉर्नर, चंदासिंघ कॉर्नर, धनेगाव चौक, वाजेगाव, जुना पूल, देगलूर नाका, बाफना मार्गे, रज्जा चौक मार्गे, माळटेकडी मार्गे सुरु राहणार आहे़