नांदेडला़ ‘अवकाळी’ने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 12:23 AM2018-03-12T00:23:38+5:302018-03-12T00:24:00+5:30
शहरासह जिल्ह्यात बहुतांश भागात रविवारी सायंकाळी साडेसात ते आठ वाजेदरम्यान अवकाळी पावसाने झोडपले़ नांदेडात जवळपास अर्धा तास झालेल्या धो-धो पावसाने रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. वादळी वा-यामुळे बहुतांश भागातील वीजपुरवठा खंडित झाला़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : शहरासह जिल्ह्यात बहुतांश भागात रविवारी सायंकाळी साडेसात ते आठ वाजेदरम्यान अवकाळी पावसाने झोडपले़ नांदेडात जवळपास अर्धा तास झालेल्या धो-धो पावसाने रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. वादळी वा-यामुळे बहुतांश भागातील वीजपुरवठा खंडित झाला़
दोन दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलानंतर शनिवारी सायंकाळी पावसाचे काही भागात आगमन झाले़ तर रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते़ त्यातच सायंकाळी वादळी वा-यासह पावसाने हजेरी लावली़ दरम्यान, सात वाजेच्या सुमारास वादळी वा-यासह अवकाळी पावसाने शहरास झोडपले़ अचानक झालेल्या पावसामुळे रविवारची सुटी साजरी करण्यासाठी सायंकाळी घराबाहेर पडलेल्या चाकरमान्यांची मोठी धांदल उडाली़
वादळी वाºयासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणचे होर्डिंग्ज रस्त्यावर पडले होते़ तर सखल भागात पाणी साचले होते़ अर्धा ते पाऊण तास झालेल्या धो-धो पावसाने सायंकाळी शहरात असलेल्या लग्न सोहळ्यातील सर्वांचीच धांदल उडाली़
वाºयामुळे अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्या तुटून पडल्या़ कंधार तालुक्यातील कौठा परिसरात तसेच लोहा, गडगा, कुरूळा, नरसी फाटा, पिंपळगाव येवला, वन्नाळी, मुक्रमाबाद आदी भागातही अवकाळी पावसाने हजेरी लावली़
१४ व १५ मार्चदरम्यान पाऊस होण्याची शक्यता
सध्या मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार असून येत्या दोन ते तीन दिवसांत यात अधिक वाढ होईल़ तसेच दोन दिवसांत चक्रीय कमी दाबाचे क्षेत्रात रूपांतर होईल़ पश्चिम-उत्तर दिशेला अरबी समुद्राच्या दिशेला हा कमी दाबाचा पट्टा १४ व १५ मार्चदरम्यान सरकेल़ याचा परिणाम म्हणून दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, असा अंदाज खगोलशास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी व्यक्त केला.