नांदेडवासियांचा घसा कोरडा, नगरसेवकांना सिक्कीमचे डोहाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 12:51 AM2018-11-18T00:51:04+5:302018-11-18T00:53:04+5:30

पिण्याच्या पाण्यासंदर्भातील शहरावासीयांची चिंता वाढत असताना नगरसेवक मात्र सिक्कीम येथे होणाºया प्रशिक्षण दौ-यावर उताविळ झाले आहेत. उलट महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक हे पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करुन सिक्कीम मधील गंगटोक येथे होणा-या दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराच्या तयारीला लागले आहेत.

Nandedas do not get sore throat; | नांदेडवासियांचा घसा कोरडा, नगरसेवकांना सिक्कीमचे डोहाळे

नांदेडवासियांचा घसा कोरडा, नगरसेवकांना सिक्कीमचे डोहाळे

googlenewsNext
ठळक मुद्देप्रकल्पातून अवैध उपसा दौऱ्याची तयारीही जोरात

नांदेड :विष्णूपुरी प्रकल्पातून होत असलेला मोठ्या प्रमाणातील अवैध उपसा नांदेड शहरवासीयांचा घसा कोरडा करणारा ठरणार आहे. पिण्याच्या पाण्यासंदर्भातील शहरावासीयांची चिंता वाढत असताना नगरसेवक मात्र सिक्कीम येथे होणाºया प्रशिक्षण दौ-यावर उताविळ झाले आहेत. उलट महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक हे पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करुन सिक्कीम मधील गंगटोक येथे होणा-या दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराच्या तयारीला लागले आहेत.
आर्थिक संकटात सापडलेल्या महापालिकेला या प्रशिक्षणाच्या खर्चातून वाचविण्याची मागणी सामान्य नागरिकातून होत आहे. कर्जबाजारी असलेल्या महापालिकेला मागील चार वर्षाचे ठेकेदारांचे देयके अदा करता आले नाही. कोणतेही नवीन विकास कामेही महापालिकेने गेल्या काही दिवसात सुरू केली नाही.
नगरसेवकांची स्वच्छा निधीची मागणीही आता कुठे पूर्ण होत आहे. अद्याप ही कामे निविदा प्रक्रियेतच आहेत. आर्थिक संकटामुळे ही सर्व विकास कामे रखडली आहेत. असे असताना प्रशिक्षणासाठी लाखोंची उधळपट्टी कशासाठी? असा प्रश्नही पुढे आला आहे. नगरसेवकांच्या प्रशिक्षण दौºयाला नागरिकांचा होत असलेला विरोध लक्षात घेता महापालिकेचे नगरसेवक बापुराव गजभारे सदर प्रशिक्षण खर्चासाठी आपले दोन महिन्याचे मानधन देण्याची तयारी दर्शविली आहे. इतर नगरसेवकांनी मात्र अद्याप या विषयावर आपले मत मांडले नाही. नवीन नगरसेवकांना हे प्रशिक्षण आवश्यक असल्याचे गजभारे यांनी म्हटले आहे. त्याचवेळी स्वत:चे मानधन प्रशिक्षणासाठी खर्च करण्याची तयारी दर्शविली आहे. इतर नगरसेवक गजभारे यांच्यासारखी भूमिका घेतील काय? हा प्रश्न आता पुढे आला आहे. पाण्यासारख्या गंभीर प्रश्नावर महापालिका पदाधिकारी अथवा नगरसेवकांनीही कोणतीही भूमिका घेतली नाही.

Web Title: Nandedas do not get sore throat;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.