नांदेडात शेतकरी संघटनेचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 12:13 AM2017-08-02T00:13:25+5:302017-08-02T00:13:25+5:30

शेतकºयांना खºया अर्थाने कर्जमुक्त करावे यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ या मोर्चात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते़

Nandedat Farmers' Association Front | नांदेडात शेतकरी संघटनेचा मोर्चा

नांदेडात शेतकरी संघटनेचा मोर्चा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: शेतकºयांना खºया अर्थाने कर्जमुक्त करावे यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ या मोर्चात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते़
सरकारने शेतमालावरील सर्व बंधने हटवून सरकारी हस्तक्षेप थांबवावा़ शेतीमालाचे भाव नियंत्रित करण्यासाठी निर्यात शुल्क वाढविणे, निर्यातीवर बंदी, चढ्या दराने परदेशातून आयात करणे, साठ्यांवर मर्यादा आदी उपाय बंद करावेत़ शेतकºयांना खुल्या अर्थव्यवस्थेचा लाभ घेऊ द्यावा़ आधारभूत किंमत ठरविणे आणि त्या किमतीमध्ये सर्व शेतीमाल खरेदीसाठी आवश्यक यंत्रणा उभी करणे हे अव्यवहार्य आहे़ वायदे बाजार हे बाजार किमतीच्या संशोधनाचे उत्तम साधन आहे़ जमीन धारण करणे, हस्तांतर करणे, कसावयास देणे, जमिनीचा उपयोग, सक्तीचे अधिग्रहण आदींच्या संदर्भाने अनेक अडचणींचे कायदे आहेत़ भूमिहीन होण्यास मज्जाव करणारे कायदे रद्द होण्याची गरज आहे़ संशोधन व गुंतवणूक यासाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मार्ग पूर्णपणे खुले व्हावेत, ग्रामीणसाठी रस्ते, शेतरस्ते, वीज, पाणी, साठवणूक व प्रक्रिया वाहतूक विपणन माहिती तंत्रज्ञान व प्रयोगशाळा आदी संरचनासाठी गुंतवणूकीची गरज आहे़ शेतीची साधने करमुक्त करावी आदी मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने मोर्चा काढला़
माजी प्रदेश अध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर, शिवाजीराव शिंदे उंचेगांवकर, अ‍ॅड़ धोंडिबा पवार, जमनाबाई ढगे, विठ्ठल जाधव, रामराव कोंडेकर, व्यंकटराव वडजे, शिवराज थडीसावळीकर, भीमराव शिंदे, किशनराव इळेगावकर, गणेश कदम, विठ्ठल रेड्डी, गोविंदराव लोंढे, शिवाजी जाधव आदींची उपस्थिती होती़

Web Title: Nandedat Farmers' Association Front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.