नांदेडात पेट्रोल ८५ रुपयांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 01:03 AM2018-07-09T01:03:07+5:302018-07-09T01:04:20+5:30
मार्च महिन्यांपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत होती़ मे महिन्यात नांदेडात पेट्रोलचे प्रति लिटरचे दर ८७ रुपये ७० पैशाच्या उच्चांकावर गेले होते़ परंतु गेल्या काही दिवसात इंधनाचे दर काही पैशांनी कमी झाले आहेत़ रविवारी नांदेडात पेट्रोल प्रति लिटर ८५ रुपये होते़ मे महिन्याच्या तुलनेत हे दर २ रुपये ७० पैशांनी कमी आहेत़ परंतु हे दर आणखी कमी व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड :मार्च महिन्यांपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत होती़ मे महिन्यात नांदेडात पेट्रोलचे प्रति लिटरचे दर ८७ रुपये ७० पैशाच्या उच्चांकावर गेले होते़ परंतु गेल्या काही दिवसात इंधनाचे दर काही पैशांनी कमी झाले आहेत़ रविवारी नांदेडात पेट्रोल प्रति लिटर ८५ रुपये होते़ मे महिन्याच्या तुलनेत हे दर २ रुपये ७० पैशांनी कमी आहेत़ परंतु हे दर आणखी कमी व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे़
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या दरात वाढ झाल्यानंतर देशभरात इंधन दरवाढीचा भडका उडाला़ कर्नाटक निवडणुकीच्या काळात सरकारने इंधन दरवाढ केली नव्हती़ निवडणुका संपताच मात्र दरवाढीचा शॉक देण्यात आला़ साधारणता मार्च महिन्यापासून दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत होती़ दररोज काही पैशांनी होणारी ही वाढ मात्र सर्वसामान्यांना मेटाकुटीला आणणारी ठरली़ २६ मे रोजी नांदेडात पेट्रोलचे दर ८७़२५ पैसे तर डिझेल ७३़६८ पैसे होते़ त्यानंतर २७ मे पेट्रोल-८७़४०, डिझेल-७३़८४, २८ मे पेट्रोल-८७़५४, डिझेल-७३़९६, ३० मे पेट्रोल-८७़६९, डिझेल-७४़०९, १ जून रोजी पेट्रोल-८७़५६, डिझेल-७३़९९, ३ जून-पेट्रोल-८७़३९ व डिझेलचा दर ७३़८९ पैशावर होता़ त्यानंतर अनेक राजकीय पक्षांनी आंदोलने केली़
ट्रान्सपोर्ट संघटनेनेही चक्काजामचा इशारा दिला होता़ त्यात जुलै महिन्यात मात्र महागाईने होरपळणाऱ्या नागरीकांना थोडा का होईना दिलासा मिळाला आहे़ २ जुलै रोजी पेट्रोल-८४़४३, डिझेल-७१़८६, ३ जुलै-पेट्रोल-८४़४३, डिझेल-७१़८६, ४ जुलै पेट्रोल-८४़४३, डिझेल-७१़८६, ५ जुलै पेट्रोल-८४़५९, डिझेल-७१़९८, ६ जुलै पेट्रोल-८४़७२, डिझेल-७२़१५, ७ जुलै पेट्रोल-८४़८५, डिझेल- ७२़२५ तर रविवारी पेट्रोल-८५ रुपये तर डिझेलचे दर ७२़३६ पैशावर पोहचले होते़ गेल्या चार दिवसात इंधनाच्या दरात काही पैशांची वाढ करण्यात आली आहे़
येत्या काही दिवसात इंधनामध्ये अशाप्रकारे चढ-उतार होण्याची शक्यता पेट्रोल पंप चालक वर्तवित आहेत़ दरम्यान, वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमुळे राज्य परिवहन महामंडळासह खाजगी ट्रव्हसल्स चालकांनीही आपल्या तिकीट दरात मोठी वाढ केल्याचे दिसून आले़
---
स्कुल बस चालकांनी दिला होता भाडेवाढीचा इशारा
पेट्रोलच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्यामुळे शहरात धावणाºया स्कुल बस चालकांनी नवीन शैक्षणिक वर्षापासून भाडेवाढ करण्याचा इशारा दिला होता़ या भाडेवाढीबाबत पालकांनी संताप व्यक्त केला होता़