नांदेडात चिमुकल्याचा निर्घृण खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 12:04 AM2018-03-05T00:04:30+5:302018-03-05T00:05:14+5:30

शनिवारी सायंकाळी घरासमोरील अंगणात खेळताना बेपत्ता झालेल्या सहा वर्षीय चिमुकल्याचा रविवारी मिलगेट परिसरातील जंगलात मृतदेह आढळला़ चिमुकल्याच्या डोक्यावर जखमा असून चेहराही विद्रूप केला आहे़ या प्रकरणात वजिराबाद पोलिसांनी खून असल्याचा संशय वर्तविला आहे़ या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे़

 Nandedata's Little Murdered Blood | नांदेडात चिमुकल्याचा निर्घृण खून

नांदेडात चिमुकल्याचा निर्घृण खून

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : शनिवारी सायंकाळी घरासमोरील अंगणात खेळताना बेपत्ता झालेल्या सहा वर्षीय चिमुकल्याचा रविवारी मिलगेट परिसरातील जंगलात मृतदेह आढळला़ चिमुकल्याच्या डोक्यावर जखमा असून चेहराही विद्रूप केला आहे़ या प्रकरणात वजिराबाद पोलिसांनी खून असल्याचा संशय वर्तविला आहे़ या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे़
खडकपुरा भागात शेख शोएब शेख सलीम हा सहा वर्षीय चिमुकला आईवडील व भावासह राहत होता़ शोएबचे आई आणि वडील हे दोघेही मजुरीची कामे करतात़ शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास तो घराबाहेर अंगणात खेळत होता़ त्यानंतर तो बेपत्ता झाला़ शोएबच्या आईवडिलांनी त्याचा परिसरात अनेक ठिकाणी शोध घेतला़ परंतु तो सापडला नाही़ त्यानंतर या प्रकरणात वजिराबाद पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली़ दरम्यान, रविवारी दुपारी उस्मानशाही मिलच्या पाठीमागे असलेल्या जंगलात एका मुलाचा मृतदेह पडल्याचे काहींच्या नजरेस पडले़ त्यांनी ही बाब वजिराबाद पोलिसांना कळविली़ वजिराबाद पोलिसांनी घटनास्थळ गाठून तो बेपत्ता असलेला शोएब असल्याचे स्पष्ट केले़ शोएबच्या डोक्यावर जड वस्तूने मारहाण करण्यात आली होती़
त्याचबरोबर ओळख पटू नये यासाठी चेहराही विद्रूप करण्यात आला होता़ पोलिसांनी लगेच श्वानपथकाला पाचारण केले़ श्वानपथकाने घटनास्थळापासून ते शोएबच्या घरापर्यंत माग काढला़ या प्रकरणात वजिराबाद पोलिसांकडून शोएब खेळत असताना नेमका कुणासोबत इथपर्यंत आला़ त्याच्यासोबत कोण होते? याची चौकशी सुरु केली आहे़

Web Title:  Nandedata's Little Murdered Blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.