नांदेडकरांची पहाट आगीच्या दोन घटनांनी; फर्निचरचा कारखाना आणि कार जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2022 11:13 AM2022-01-29T11:13:53+5:302022-01-29T11:15:02+5:30
शहरातील बिलाल नगर आणि मिल गेट रस्त्यावर दोन घटना घडल्या.
नांदेड : शहरात शनिवारी पहाटे आगीच्या दोन घटना घडल्या. यामध्ये एका घटनेत फर्निचरचा कारखाना तर दुसऱ्या घटनेत फॉर्च्युनर गाडी जळून खाक झाली. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणली, त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
शहरातील बिलाल नगर येथे मोहम्मद शोएब यांच्या शोएब फर्निचरच्या कारखान्यात पहाटे ३.४० च्या सुमारास आग लागली. नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले, यावेळी अग्निशमन दल अग्निशमन वाहनासह घटनास्थळी पोहचले. आग आजुबाजूच्या परिसरात पसरत होती, शोएब फर्निचर च्या कारखान्याला लागुनच अन्य दुसरे फर्निचरचे कारखाने होते. आग जास्तच पसरत होती,परंतु अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रसंगावधान बाळगत पसरणारी आग अगोदर आटोक्यात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
मिल गेट रस्त्यावर द बर्निग फॉर्च्युनर
शहरात घडलेल्या आगीच्या दुसऱ्या घटनेत सोमेश कॉलनी जवळ मिल गेट रस्त्यावर फॉर्च्युनर कारला आग लागली. ही घटना पहाटे ४.१५ वाजता घडली. मोहम्मद यासेर यांची MH-43-AB- 7700 Toyota fortuner ही कार मिल गेट रस्त्याच्या कडेला लावलेली होती. पहाटेच्या सुमारास या गाडीला आग लागल्याने एकच गोंधळ उडाला, दरम्यान अग्निशमन दलास बोलावून आग आटोक्यात आणण्यात आली. परंतु, दोन्ही घटनेतील आगीचे कारण स्पष्ट झाले नाही.