नांदेडच्या बडतर्फ सहाय्यक आयुक्ताला धुळ्यात अटक

By admin | Published: July 3, 2017 05:46 PM2017-07-03T17:46:51+5:302017-07-03T17:46:51+5:30

बनावट कागदपत्रांचा आरोप : धुळे पोलिसांच्या मदतीने केली कारवाई

Nanded's Assistant Commissioner was arrested in Dhule | नांदेडच्या बडतर्फ सहाय्यक आयुक्ताला धुळ्यात अटक

नांदेडच्या बडतर्फ सहाय्यक आयुक्ताला धुळ्यात अटक

Next

 ऑनलाईन लोकमत

धुळे, दि.3 - अन्न व औषध प्रशासन विभागातील फरार बडतर्फ सहाय्यक आयुक्त नितीन शंकरराव देवरे याला नांदेड पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा धुळे पोलिसांची मदतीने अटक केली़  बनावट कागदपत्रं तयार करुन नोकरी मिळविल्याचा त्याच्यावर आरोप आह़े ते मुळचे धुळयाचे रहिवासी आहेत. 
गेल्या काही वर्षापासून पोलिसांना विविध कारणाने चकवा देणारे अन्न व औषध प्रशासनातील बडतर्फ सहाय्यक आयुक्त नितीन देवरे हे धुळे शहरातील जयहिंद कॉलनी येथे राहत होत़े त्यानी बनावट प्रमाणपत्र सादर करुन नोकरी मिळविल्याचा त्याच्यावर आरोप आह़े  याप्रकरणी नांदेड येथील न्यायालयाच्या आदेशाने नांदेड येथील भाग्यनगर पोलिस ठाण्यात त्याच्याविरुध्द भादंवि कलम 420, 467, 468, 471 अन्वये गुन्हा दाखल  आह़े 
गुन्हा दाखल झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनातर्फे या सर्व कागदपत्रांची पडताळणी केली असता देवरे याचे कागदपत्रं बनावट असल्याचे सिध्द झाल़े यामुळे तत्कालिन राज्यपाल यांनी 20 ऑगस्ट 2013 रोजी देवरे याना शासकीय सेवेतून मुक्त केल़े यानंतर देवरे याने अटक टाळण्यासाठी नांदेड येथे सत्र न्यायालयात अर्ज केला होता़ न्या़ एम़ बी़ म्हस्के यांनी दिलेल्या 2 एप्रिल 2014 रोजी निकाल पत्रात देवरे यानी बनावट कागदपत्र सादर करुन नोकरी मिळविल्याचे सिध्द झाल्याने शासनाने त्यांना अटक करावी, असे म्हटले होते. 
त्यानंतर गेल्या काही वर्षापासून ते फरार होते. नांदेड पोलीस देवरे यांच्या शोधात होती. ते धुळे येथे एका विवाह समारंभात येणार असल्याची माहिती मिळाल्याने रविवारी धुळे पोलिसांच्या मदतीने नांदेड पोलिसांनी अटक केली. पुढील चौकशीसाठी नांदेड येथे नेण्यात आले आह़े 
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही केले काम
नितीन देवरे हे सुरुवातीला हिरे मेडीकल कॉलेज येथे औषध निर्माता वर्ग 2 या पदावर तात्पुरत्या स्वरुपात कार्यरत होते.त्यावेळी हा प्रकार देवरे यानी केला असावा, असा त्याच्यावर संशय आह़े

Web Title: Nanded's Assistant Commissioner was arrested in Dhule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.