स्वच्छता रँकिंगमध्ये नांदेडची झेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 12:33 AM2019-03-07T00:33:54+5:302019-03-07T00:34:19+5:30

स्वच्छ सर्वेक्षण २०१९ या वर्षात महापालिकेने राज्यात १९ वा आणि देशात ६० वा क्रमांक मिळवत घनकचरा व्यवस्थापन, हागणदारीमुक्त शहर, घरोघरी कचरा संकलन या सर्व बाबींमुळे महापालिकेने स्वच्छतेतील आपले स्थान दरवर्षी उंचावले आहे.

Nanded's jump in cleanliness ranking | स्वच्छता रँकिंगमध्ये नांदेडची झेप

स्वच्छता रँकिंगमध्ये नांदेडची झेप

googlenewsNext
ठळक मुद्देराज्यात ३८ व्या स्थानावरुन १९ व्या स्थानी तर देशात १३० हून ६० व्या स्थानी

नांदेड : स्वच्छ सर्वेक्षण २०१९ या वर्षात महापालिकेने राज्यात १९ वा आणि देशात ६० वा क्रमांक मिळवत घनकचरा व्यवस्थापन, हागणदारीमुक्त शहर, घरोघरी कचरा संकलन या सर्व बाबींमुळे महापालिकेने स्वच्छतेतील आपले स्थान दरवर्षी उंचावले आहे.
जवळपास ५ लाख ५० हजार लोकसंख्या असलेल्या नांदेड शहरात २० प्रभाग आहेत. शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी असलेल्या मानांकनात महापालिकेने गतवर्षीच्या ३८ व्या स्थानावरुन १९ व्या स्थानावर झेप घेतली आहे. यासाठी शहरात गतवर्षीपासून आर अँड बी या कंपनीमार्फत कचरा उचलण्याचे काम सुरु झाले. यापूर्वीच्या ए टू झेड या स्वच्छता ठेकेदाराने अचानकपणे पळ काढल्याने शहरात स्वच्छतेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. ऐन निवडणुकीच्या काळात अस्वच्छतेचा विषय ऐरणीवर आला होता. निवडणुकीनंतर तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख यांनी आर अँड बी या ठेकेदाराकडून शहर स्वच्छतेच्या कामाला प्रारंभ केला. या कंपनीमार्फत घरोघरी जावून कचरा उचलण्याचे काम सुरु करण्यात आले. त्याचवेळी तुप्पा येथील डंपींग ग्राऊंडवर असलेल्या कचऱ्यावर बायोमायनिंग करण्याचा प्रकल्पही महापालिकेने हाती घेतला आहे.
नांदेड महापालिकेने आपले क्षेत्र २०१७ मध्ये हागणदारीमुक्त घोषित केले होते. शहरात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक शौचालयाच्या कामासाठी अनुदान देण्यात आले. नांदेड शहराला हागणदारीमुक्त शहर म्हणून घोषित केल्यानंतर एका पथकाने पुन्हा एकदा शहरात सर्वेक्षण केले. त्या सर्वेक्षणातही नांदेड शहर हागणदारीमुक्त आढळले.नांदेड शहराला तपासणीत ओडीएफ प्लस म्हणून घोषित करण्यात आले.
शहरात शौचालयाचा वापर करण्यासाठी नागरिकांना प्रवृत्त करण्यात येत आहे. वैयक्तिक शौचालयासह सार्वजनिक २५ ठिकाणी शौचालय बांधण्यात आले आहेत. ११ शौचालय ही झोपडपट्टी भागात आहेत. या शौचालयाच्या देखभालीचे कामही खाजगी संस्थांकडे सोपविण्यात आले आहे.
शहर हागणदारीमुक्त राहण्यासाठी महापालिकेने विशेष पथकांची स्थापना करुन उघड्यावर शौचास जाणाऱ्या, लघुशंका करणाºया, उघड्यावर कचरा फेकणाºया नागरिकांविरुद्ध दंडात्मक कारवाई तसेच गुन्हेही दाखल केले आहेत. प्लास्टिकबंदी अभियानात आवश्यक ती जनजागृती, दंडात्मक कार्यवाही करण्यात आली आहे.
दुसरीकडे शहर स्वच्छतेबाबत नांदेड शहराला टू स्टार रेटींगसाठी प्राप्त झाले आहे. ही रेटींग कचरा संकलन, वाहतूक, संकलित केलेल्या कचºयावर शास्त्रशुद्ध प्रक्रिया करणे, त्याची विल्हेवाट लावणे आदी बाबी पाहिल्या जातात.
स्वच्छतेसाठी काम पाहणाºया स्वच्छतादूताला महापालिकेने प्रशिक्षण दिले. आरोग्यरक्षण तसेच सुरक्षेसाठी आवश्यक ते साहित्य उपलब्ध करुन दिले. कचरा उचलणाºया घंटागाड्यासाठी रुट मॅपही महापालिकेने तयार करुन दिला. या रुट मॅपनुसार घंटागाड्या धावतात की नाही, हे पाहण्यासाठी सदर वाहनावर जीपीएस यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली आहे. या सर्व उपाययोजनामुळे महापालिकेचे स्वच्छतेचे स्थान दरवर्षी उंचावत आहे.
आयुक्त लहुराज माळी, स्वच्छता विभागाचे सहायक आयुक्त गुलाम सादिक, स्वच्छ महाराष्टÑ अभियानचे कार्यकारी अभियंता मो. कलीम परवेज, सर्व क्षेत्रीय अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, स्वच्छतादूताचे परिश्रम कामी आले आहेत.

स्वच्छतेच्या उपाययोजनांचे यश-आयुक्त माळी
महापालिकेने शहर स्वच्छ सर्वेक्षण अभियानात राज्यात ३८ व्या स्थानावरुन १९ व्या स्थानावर तर देशात नागपूर, ग्वाल्हेर नंतर देशात ६० वे स्थान मिळविले आहे. ही बाब निश्चितच समाधानकारक आहे. स्वच्छतेबाबत आणखी सुधारणेला वाव आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी ३० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसेच तुप्पा डंपींग ग्राऊंडवर बायोमायनिंगसाठी ५ कोटी रुपये प्रस्तावित केले आहेत. घनकच-यावरील प्रक्रिया प्रकल्पासाठीही ५० कोटी रुपये तरतूद करण्यात आले असल्याचे आयुक्त लहुराज माळी यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.

Web Title: Nanded's jump in cleanliness ranking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.