नांदेडच्या थ्रेड ज्वेलरीची अमेरिकन महिलांना भुरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 12:21 AM2018-03-08T00:21:47+5:302018-03-08T00:22:19+5:30

ग्रामीण भागात आजही ‘चूल आणि मूल’ ही महिलांसाठी म्हण प्रसिद्ध आहे, परंतु ही म्हण मोडीत काढत घरी रिकाम्या वेळेत सुरुवातीला छंद म्हणून सुरु केलेल्या सिल्क थ्रेड ज्वेलरीमुळे आजघडीला अनेकांना रोजगार मिळाला आहे़ नांदेडच्या गोकुळनगर भागात राहणाºया भावना विपुल मोळके या गृहिणीने सुरु केलेल्या ज्वेलरीला आता थेट परदेशातून मागणी होत आहे़अमेरिकन महिलांनाही नांदेडच्या या सिल्क थ्रेड ज्वेलरीची भुरळच पडली आहे़

Nanded's Thread Jewelry Tracks American Women | नांदेडच्या थ्रेड ज्वेलरीची अमेरिकन महिलांना भुरळ

नांदेडच्या थ्रेड ज्वेलरीची अमेरिकन महिलांना भुरळ

googlenewsNext

शिवराज बिचेवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : ग्रामीण भागात आजही ‘चूल आणि मूल’ ही महिलांसाठी म्हण प्रसिद्ध आहे, परंतु ही म्हण मोडीत काढत घरी रिकाम्या वेळेत सुरुवातीला छंद म्हणून सुरु केलेल्या सिल्क थ्रेड ज्वेलरीमुळे आजघडीला अनेकांना रोजगार मिळाला आहे़ नांदेडच्या गोकुळनगर भागात राहणाºया भावना विपुल मोळके या गृहिणीने सुरु केलेल्या ज्वेलरीला आता थेट परदेशातून मागणी होत आहे़अमेरिकन महिलांनाही नांदेडच्या या सिल्क थ्रेड ज्वेलरीची भुरळच पडली आहे़


एका रंगाच्या धाग्यापासून गळ्यातील दागिना, साडी पिना, क्लचर, टिपटॉप, पिना, बांगटिका, बाजूबंद अशा जवळपास १५ हून अधिक वस्तू या महिला तयार करतात़ महत्त्वाचे म्हणजे या सर्व वस्तू रंगीत धाग्यापासून हाताने विणून बनविल्या आहेत़ यासाठी कोणत्याही यंत्राचा वापर करण्यात आला नाही़ वर्षभरापूर्वी संसाराची जबाबदारी पार पाडताना केवळ छंद म्हणून सुरु केलेल्या या व्यवसायाचा पसारा आता वाढत चालला आहे़ यातून सुरुवातीला दोन महिलांना रोजगार मिळाला होता़ आता जवळपास दहा महिलांचे कुटुंब या व्यवसायावर अवलंबून आहे़ या महिलांना त्यातून महिन्याकाठी सहा हजार रुपये मिळतात़ पहिल्यांदा काही सिल्क थ्रेड ज्वेलरी तयार केल्यानंतर त्याचे छायाचित्र सोशल मीडियावर टाकण्यात आले होते़ त्यातूनच आजघडीला नांदेडची ही सिल्क थ्रेड ज्वेलरी थेट अमेरिकेपर्यंत पोहोचली़ तसेच गुजरात, औरंगाबाद, पुणे येथेही ज्वेलरी पाठविली जाते़

घरातील कामे आटोपल्यानंतर टीव्ही पाहणे किंवा इतर गोष्टींमध्ये वेळ वाया घालविण्यापेक्षा काहीतरी वेगळे करावे म्हणून सिल्क थ्रेड ज्वेलरी बनविण्यास सुुरुवात केली़ शेजारील काही महिलांना प्रशिक्षण दिले़ त्याही या व्यवसायात मदत करु लागल्या़ घराशेजारीच महिलांना रोजगार मिळू लागला़ या व्यवसायाच्या माध्यमातून परिसरातील किमान १०० महिलांना रोजगार मिळावा, असा मानस असल्याचे भावना मोळके म्हणाल्या़

Web Title: Nanded's Thread Jewelry Tracks American Women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.