नरसीत स्वस्त धान्य जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 12:22 AM2018-01-28T00:22:39+5:302018-01-28T00:22:45+5:30
नरसी येथील एका अडत दुकानावर रामतीर्थ पोलिसांनी छापा मारून स्वस्त धान्याचा ९३ हजारांचा माल जप्त केला असून दोघांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नरसी फाटा : नरसी येथील एका अडत दुकानावर रामतीर्थ पोलिसांनी छापा मारून स्वस्त धान्याचा ९३ हजारांचा माल जप्त केला असून दोघांविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नायगाव तालुका स्वस्त धान्याच्या काळ्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे. अनेकजण या व्यवसायात उतरून झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने पाहतात. नेहमीच नायगाव तहसीलच्या सहकार्याने हा काळा बाजार राजरोसपणे चालतो. नरसी येथील मुखेड रस्त्यावरील राजराजेश्वर ट्रेडिंग नावाच्या अडात दुकानावर २६ जानेवारी रोजी सायंकाळी ९ वाजताच्या सुमारास रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनि दिलीप गाडे यांना खबºयाकडून मिळालेल्या माहितीवरून छापा टाळला. सदरील छाप्यात पोलिसांना ५३ क्विंटल गहू व १२ क्विंटल तांदूळ असा ९३ हजारांचा स्वस्त धान्याचा माल मिळाला असून याप्रकरणी रामदास गुंतापल्ले व केशव गुंतापल्ले यांच्याविरुद्ध जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नायगाव तातुक्यात स्वस्त धान्याच्या काळा बाजार करणारे मोठे रॅकेट असून सदरचे धान्य नियमित कृष्णूर एमआयडीसीमधील पीठ गिरण्याला जात असताना ह्या पीठ गिरण्यांना संरक्षण देण्याचं काम मात्र कुंटूर पोलीस करीत असल्याचे स्पष्ट होते. दरम्यान, स्वस्त धान्याचा मोठ्या प्रमाणावर होणारा काळा बाजार बंद करण्याची व गोरगरिबांना धान्याचे वाटप वेळेवर करण्याची मागणी होत आहे़
कारवाईमुळे संबंधितांचे धाबे दणाणले
धान्याच्या काळ्या बाजारास नायगाव तहसीलचा पुरवठा विभाग, नायगाव पोलीस ठाणेही जबाबदार असल्याची चर्चा येथे ऐकायला मिळत आहे. या कार्यवाहीमुळे धान्याचा काळा बाजार व त्यास सहकार्य करणाºयो संघटनेचे धाबे दणाणले आहेत.
२६ जानेवारी रोजी सायंकाळी ९ वाजता रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनि दिलीप गाडे यांना खबºयाकडून मिळालेल्या माहितीवरून छापा टाकण्यात आला़ यावेळी ५३ क्विंटल गहू, १२ क्विंटल तांदूळ असा ९३ हजारांचा स्वस्त धान्याचा माल जप्त केला़