देशात नैसर्गिक शेतीची आवश्यकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 12:06 AM2018-03-05T00:06:52+5:302018-03-05T00:07:03+5:30
मागील काही दिवसांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यात पिकांवर कीटकनाशकांची फवारणी केल्यामुळे २० शेतक-यांना आपला जीव गमवावा लागला. या संदर्भात कृषी विभागाने जरी संबंधित कंपनीला क्लिनचीट दिली असली तरी हे प्रकरण गंभीर आहे. त्यामुळे आज देशाला नैसर्गिक शेतीची गरज असल्याचे आम आदमी पार्टीचे ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : मागील काही दिवसांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यात पिकांवर कीटकनाशकांची फवारणी केल्यामुळे २० शेतक-यांना आपला जीव गमवावा लागला. या संदर्भात कृषी विभागाने जरी संबंधित कंपनीला क्लिनचीट दिली असली तरी हे प्रकरण गंभीर आहे. त्यामुळे आज देशाला नैसर्गिक शेतीची गरज असल्याचे आम आदमी पार्टीचे ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांनी सांगितले.
येथील शासकीय विश्रामगृहात रविवारी आम आदमी पार्टीच्या वतीने आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते़ ते म्हणाले, सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हे देशातील नागरिकांशी खेळत आहेत. आज देशात भ्रष्टाचार शिगेला पोहोचला असल्याचे सांगत त्यांनी सीसीटीव्हीचे उदाहरण दिले. ते म्हणाले, राज्य सरकारच्या वतीने मुंबईमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी करण्यात आले. त्यासाठी ९०० कोटी रूपयांचा खर्च झाला. परंतु, आम आदमी पार्टीचे सरकार असलेल्या दिल्लीत मात्र अवघ्या २७२ कोटी रूपयांत दीड लाख सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असल्याचे ब्रिगेडीअर सावंत यांनी सांगितले.
देशात आज नैसर्गिक शेतीची आवश्यकता आहे. यवतमाळ जिल्ह्यात रासायनिय कीटकनाशकांच्या फवारणीमुळे २० शेतकºयांना जीव गमवावा लागला. यासंदर्भात कृषी विभागाच्या वतीने कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. उलट औषध कंपनीला क्लीनचीट देण्यासाठी खटाटोप करण्यात आला़ परंतु, हे प्रकरण गंभीर असल्याचे ते म्हणाले़
भ्रष्टाचारमुक्त भारतसाठी आम आदमी पार्टी हा नवीन पर्याय असून येत्या ३१ मार्चपर्यंत पार्टी मजबूत करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात वाटचाल सुरू करण्यात आली आहे़
आतापर्यंत ४ तालुकाध्यक्ष, ३७ ग्राम कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. या माध्यमातून नांदेड जिल्ह्यात पक्षाची झपाट्याने वाढ होणार असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे ३० एप्रिलपर्यंत राज्यातही पार्टी मजबूत करण्यासाठी बांधणी केली जात असल्याचे ब्रिगेडीअर सावंत म्हणाले, सांगितले. यावेळी मराठवाडा समन्वयक अजिंक्य शिंदे, धनंजय जोगदंड, बालाजी आबादार, शिवाजी हंबर्डे यांच्यासह आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.