नवघरवाडी बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:14 AM2021-01-09T04:14:27+5:302021-01-09T04:14:27+5:30
साईबाबा मूर्तीची स्थापना नायगाव - शहरातील पानसरे नगर येथे साईबाबांची मूर्ती स्थापना व कलशारोहणाच्या वर्धापन दिनानिमित्त ८ ते १० ...
साईबाबा मूर्तीची स्थापना
नायगाव - शहरातील पानसरे नगर येथे साईबाबांची मूर्ती स्थापना व कलशारोहणाच्या वर्धापन दिनानिमित्त ८ ते १० जानेवारीदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात सकाळी काकडा आरती, मंगलस्नान, नैवेद्य आरती, धूपआरती, रात्री कीर्तन होणार आहे. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले.
वीज बिल वसुली
कुंडलवाडी - येथील महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज बिल वसुलीची मोहीम सुरू केली. या एकाच दिवसात २ लाख रुपये जमा केले. २१ जणांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. ही मोहीम कार्यकारी अभियंता श्रीनिवास चटलावार यांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठल गुंडले, साईनाथ लोलेवार, अनिल उसलवार, बालाजी तळणे, लक्ष्मण श्रीरामे, धोंडीबा देवनपल्ले, रजनी तेलकेश्वर, मल्लेश मोतकेवार, नीलेश संगेवार, रवी कोरेवार, योगेश शेरियार आदींनी परिश्रम घेतले.
टेंभुर्णी बिनविरोध
नायगाव - तालुक्यातील टेंभुर्णी येथील ग्रामपंचायत बिनविरोध झाली. यात सुगंधराव पाटील वडजे यांच्या पॅनलचे सुलोचना वाकरडे, सुशीलाबाई वडजे, खाजामिया, चंद्रकांताबाई गोनगोपलेवाड, स्नेहा वडजे, प्रकाश वडजे, अमृता गोरटकर, शेख तब्बू, रियाज पाशा, जिजाबाई कानडे, उज्ज्वला शेळके, सय्यद नबीसाब हे बिनविरोध निवडून आले. तहसीलदार गजानन शिंदे, नायब तहसीलदार नवनाथ वगवाड, प्रशासकीय अधिकारी कानोडे यांनी सर्वांचा सत्कार केला.
अनोळखी प्रेत सापडले
नांदेड - भाग्यनगर पोलीस ठाणे हद्दीतील नसरतपूर शिवारात रेल्वे पटरीजवळ ६५ वर्षीय अनोळखी महिलेचे प्रेत आढळले. महिलेच्या अंगावर हिरव्या रंगाचा पंजाबी ड्रेस असून, तिच्या नातेवाइकांचा अद्यापि शोध लागला नाही. सदर महिलेचे शवविच्छेदन शासकीय रुग्णालयात करण्यात आले. या महिलेबाबत कोणाला माहिती असल्यास त्यांनी भाग्यनगर पोलिसांशी संपर्क साधावा.
तत्तापुरे यांचा सत्कार
लोहा - शिवा कर्मचारी महासंघाच्या वतीने उपअभियंता जयचंद्र तत्तापुरे यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला जिल्हा उपाध्यक्ष जी.एस. मंगनाळे, बाबाराव नाईकवाडे, तालुकाध्यक्ष राम भातांब्रे, कंत्राटदार बुद्धिवंत, पृथ्वीराज तत्तापुरे, प्रमुख संघटक शिवाजीराव कहाळेकर, जिल्हा सहसचिव संभाजी पावडे उपस्थित होते.
अवैध दारूची विक्री
हिमायतनगर - हिमायतनगर शहर व ग्रामीण भागात अवैध दारूची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. याकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. सगळीकडे दारूच्या पार्ट्या सुरू आहेत. गरजू उमेदवार मतदारांना खुश करण्यासाठी दारूची जमवाजमव करीत आहेत.
विकास कामांचे उद्घाटन
कंधार - शहरातील २५ लाख ३१ हजार रुपये खर्चाच्या रस्त्याच्या विकास कामाचे उद्घाटन ७ जानेवारी रोजी अरविंद नळगे व बब्बर मोहम्मद यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक मन्नान चौधरी, हमीद सुलेमान, अजीमोद्दीन बब्बर मोहम्मद, मकदुम कुरेशी, शेख मुजीब, शेख खालेद, सय्यद सलीम, सय्यद मिया, अब्दुल सुलेमान, शेख खैसर आदी उपस्थित होते.