Navneet Rana: "पवारांच्या आशीर्वादानेच नवनीत राणा निवडून आल्या, त्यांची लायकी नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 07:55 PM2022-09-07T19:55:44+5:302022-09-07T20:15:23+5:30

हिंगोली लोकसभेचे माजी खासदार सुभाष वानखेडे हे नांदेड येथे आले असता त्यांनी राणा दाम्पत्यावर सडकून टीका केली.

Navneet Rana was elected with Pawar's blessings, he is not worthy, Says Shivsena leader subhash wankhede | Navneet Rana: "पवारांच्या आशीर्वादानेच नवनीत राणा निवडून आल्या, त्यांची लायकी नाही"

Navneet Rana: "पवारांच्या आशीर्वादानेच नवनीत राणा निवडून आल्या, त्यांची लायकी नाही"

googlenewsNext

नांदेड - अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांमनी सातत्याने शिवसेनेवर आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर प्रहार केला आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतरही त्यांच्याकडून उद्धव ठाकरेंना टार्गेट करण्यात येत आहे. त्यावर, शिवसेनेच्या महिला नेत्यांकडून प्रत्युत्तरही देण्यात येते. आता, माजी खासदार आणि नुकतेच शिवसेनेत घरवापसी केलेले सुभाष वानखेडे यांनी नवनीत राणा कौर यांच्यावर शाब्दीक घणाघात केला आहे.

हिंगोली लोकसभेचे माजी खासदार सुभाष वानखेडे हे नांदेड येथे आले असता त्यांनी राणा दाम्पत्यावर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे यांना एकेरी भाषेत बोलण्याची नवनीत राणा यांची लायकी नाही. त्या 2019 च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आशीर्वादाने निवडून आल्या आहेत, अशा शब्दात वानखेडे यांनी राणांचा समाचार घेतला.

भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याच्या तयारीत असलेल्या राणा दापत्यांनी भाजपचा जयजयकार करावा. पण शिवसेनेच्या नादाला लागाल तर येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीमध्ये आम्ही त्यांची जागा दाखवू. कोण नवनीत राणा? महाराष्ट्रामध्ये आलेली बिन बुलाई मेहमान आहे. राणा दापत्यांने उद्धव ठाकरेंविषयी अपशब्द वापरू नये, असेही वानखेडे यांनी समजावले आहे. 

मेळावा उद्धव ठाकरेच घेतील

येणारा दसरा मेळावा उद्धव ठाकरे हेच घेतील. गेली 50-60 वर्षांपासून शिवसेना पक्षप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे सभा घ्यायचे. आता उद्धव ठाकरेच सभा घेतील, हा माझा ठाम विश्वास आहे, असेही सुभाष वानखेडे यांनी म्हटले. 

लव्ह जिहादचा खात्मा करणार - राणा

महाराष्ट्राच्या विकासासाठी जी लढाई आम्ही लढलो ती आम्ही जिंकलो आहोत. येणाऱ्या काळात लव जिहादच्या विरोधात आम्ही मोठी मोहीम उभारू. लव्ह जिहादचा खात्मा करण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे, अमरावती जिल्ह्यापासून आम्ही त्याची सुरुवात केली आहे आणि जळगावत त्याचं जाहीर आव्हान करत असल्याचे वक्तव्य खासदार नवनीत राणा यांनी केले.
 

Web Title: Navneet Rana was elected with Pawar's blessings, he is not worthy, Says Shivsena leader subhash wankhede

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.