संभाव्य तिसऱ्या कोरोना लाटेत मुलांना सांभाळण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:18 AM2021-05-20T04:18:50+5:302021-05-20T04:18:50+5:30

चौकट----------- जिल्ह्यात संभाव्य तिसऱ्या लाटेत मुलांना कोरोनाचा अधिक धोका असल्याची शक्यता पाहता ५०० खाटांची तयारी केली जात आहे. डॉ. ...

The need to care for children in a potential third corona wave | संभाव्य तिसऱ्या कोरोना लाटेत मुलांना सांभाळण्याची गरज

संभाव्य तिसऱ्या कोरोना लाटेत मुलांना सांभाळण्याची गरज

Next

चौकट-----------

जिल्ह्यात संभाव्य तिसऱ्या लाटेत मुलांना कोरोनाचा अधिक धोका असल्याची शक्यता पाहता ५०० खाटांची तयारी केली जात आहे. डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय, श्री गुरुगोविंदिसंघजी जिल्हा रुग्णालय, शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयात मुलांसाठी उपचाराच्या सेवासुविधा पुरविण्यात येणार आहेत. स्वतंत्र बालरोग तज्ज्ञांचा स्वतंत्र टास्क फोर्स तयार करून उपचाराबाबतच्या कृती आराखडा तयार केला जात आहे.

सध्या मोठ्यांचे लसीकरण केले जात आहे. लहान मुलांच्या लसीकरणाबाबतही संशोधन सुरू आहे. परंतु आता तिसऱ्या संभाव्य लाटेत मुलांना कोरोनाचा धोका अधिक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. घरात कोणी बाधित असेल तर लहान मुलांच्याही तपासण्या करणे आवश्यक आहे. मुलांमध्ये लक्षणे आढळून येत नाहीत परंतु ते इतरांना संसर्ग करु शकतात. बाधित गरोदर मातापासूनही त्यांच्या बाळांना कोरोना संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या नवजात अर्भकाची चाचणी वेळीच करणे आवश्यक आहे. वेळेत उपचार दिले तर मुलांना लवकर कोरोनामुक्त करता येते.

- डॉ. सलीम तांबे, बालरोग विभाग प्रमुख,

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड.

मुलांमध्ये कोरोना लक्षणे

कोरोनाबाधित मुलांमध्ये मोठ्यासारखीच लक्षणे असतात. त्यात ताप येणे, सर्दी, शिंका, अशक्तपणा आदी लक्षणांचा समावेश आहे. ही सौम्य लक्षणे आहेत. मध्यम स्वरूपाच्या लक्षणांमध्ये श्वास घेण्यास अडचण, न्युमोनियाची लागण तसेच शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाणही ९८-९९ वरून ९० ते ९३ च्या दरम्यान येऊ शकते. तीव्र स्वरूपाच्या लक्षणांमध्ये ताप, न्युमोनिया, खोकला, श्वसनास त्रास आदी लक्षणे जाणवतात. शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाणही ९० पेक्षाही कमी होते. लवकर बरे होण्यासाठी मुलांना वेळेवर उपचार मिळणे आवश्यक आहे.

Web Title: The need to care for children in a potential third corona wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.