‘महसूल, पाेलीस विभागात समन्वय आवश्यक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:22 AM2021-08-12T04:22:48+5:302021-08-12T04:22:48+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियाेजन भवन येथे मंगळवारी महसूल दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तांबाेळी हे बाेलत हाेते. ...
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियाेजन भवन येथे मंगळवारी महसूल दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तांबाेळी हे बाेलत हाेते. महसूल आणि पाेलीस विभागाच्या समन्वयाचे अवैध बाबींनाही आळा घालणे साेपे हाेते. जिल्ह्यात अशी कारवाई सुरू असल्याचेही तांबाेळी म्हणाले.
जिल्हाधिकारी डाॅ. विपीन इटनकर यांनी काेराेना काळात आराेग्य विभागासह महसूल विभागानेही अत्यंत चांगले काम केल्याचे सांगितले. संभाव्य तिसरी लाटही दारात उभी असल्याचे वैद्यकीय तज्ञ्ज सांगत आहेत. त्यामुळे आता पुन्हा या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनीही प्रशासनात महसूल विभाग हा कणा असल्याचे सांगितले. पाेलीस अधीक्षक प्रमाेदकुमार शेवाळे यांनीही महसूल दिनानिमीत्त शुभेच्छा दिल्या.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार, कार्तिकेयन एस., निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी दिपाली माेतियाळे, प्रशांत शेळके, अनुराधा ढालकरी, शरद मंडलीक, डाॅ. सचिन खल्लाळ, संताेषी देवकाेळे, लतिफ पठाण, उपविभागीय अधिकारी विकास माने, जिवराज डाबकर, शक्ती कदम, राजेंद्र खंदारे यांच्यासह तहसीलदार संघटनेचे विभागीय अध्यक्ष किरण अंबेकर, विजय चव्हाण, महसूल कर्मचारी समन्वय समितीचे लक्ष्मण नरमवार, नायब तहसीलदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुगाजी काकडे, गिरीष येवते, हयुब पठाण, चंद्रमुनी सावंत, शेख बाबू, मधुकर वाठाेरे, सुधाकर डाेईवाड आदींची उपस्थिती हाेती. महसूल दिनाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी केले. सुत्रसंचालन मुगाजी काकडे यांनी केले तर आभार तहसीलदार विजय अवधाने यांनी मानले.