घरपोच गॅस सिलिंडर देण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:18 AM2021-03-31T04:18:05+5:302021-03-31T04:18:05+5:30
पतपेढीची सर्वसाधारण सभा नांदेड : डॉ. शंकरराव चव्हाण शारदा धनवर्धिनी सहकारी पतपेढीची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन प्रा. संतोष देवराये ...
पतपेढीची सर्वसाधारण सभा
नांदेड : डॉ. शंकरराव चव्हाण शारदा धनवर्धिनी सहकारी पतपेढीची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन प्रा. संतोष देवराये यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन संपन्न झाली. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष किशोरसिंह ठाकूर, संचालक संतोष मोरे हे प्रत्यक्ष तर इतर सभासद ऑनलाइन उपस्थित होते.
पूजा किवंदेची सैन्य दलात निवड
नांदेड : कंधार तालुक्यातील दिग्रस बु. येथे पूजा बालाजी किवंदे हिची भारतीय सैन्य दलातील बीएसएफमध्ये नियुक्ती झाली. पूजाची कौटुंबिक परिस्थिती हलाकीची असून, तिचे वडील चालक म्हणून खासगी वाहनांवर काम करतात. तिच्या नियुक्तीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
शास्तीमाफीस मुदतवाढ देण्याची गरज
नांदेड : महापालिकेने ३१ मार्चपर्यंत मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांना शास्ती माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, सद्य:स्थितीत टाळेबंदी असल्याने इच्छा असूनही नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. त्यामुळे सदर योजनेस एक महिन्याची मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी भाजपचे महानगराध्यक्ष प्रवीण साले यांनी आयुक्तांकडे केली आहे.
बेघरांना सुविधा द्या
नांदेड : लॉकडाऊनमुळे बेघर असलेल्यांसह मनोरुग्णांना अधिक फटका बसत आहे. दुकाने, हॉटेल्स सर्वकाही बंद असल्याने भिक्षा मागून पोट भरणाऱ्यांवर उपासमारीची वेळ येत आहे. शेकडो बेघर, भिक्षेकरी बंद दुकानांसमोर झाेपलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत. त्यांना निवारा, अन्न आणि पाणी उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी कॉ. डॉ. उज्ज्वला पडलवार यांनी केली आहे.