नूतन इमारतीचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:49 AM2020-12-04T04:49:23+5:302020-12-04T04:49:23+5:30
मजुरांचे स्थलांतर हदगाव - हदगाव तालुक्यातील वाडी-तांड्यांतील बेरोजगार कामाच्या शोधात स्थलांतर करीत आहेत. तालुक्यात औद्योगीकरणाचा अभाव आहे. त्यात कोरडवाहू ...
मजुरांचे स्थलांतर
हदगाव - हदगाव तालुक्यातील वाडी-तांड्यांतील बेरोजगार कामाच्या शोधात स्थलांतर करीत आहेत. तालुक्यात औद्योगीकरणाचा अभाव आहे. त्यात कोरडवाहू शेती असल्याने शेतकरी, शेतमजुरांची आर्थिक कोंडी झाली. त्यामुळे पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे दरवर्षी शेतकरी कामासाठी स्थलांतर करतात. तसेच चित्र यावेळेसही आहे.
सद्भावना यात्रेचे स्वागत
नायगाव बाजार - शीख धर्माचे पहिले गुरू गुरुनानक यांच्या जयंतीनिमित्त नांदेड ते बीदर तसेच बीदरहून परत नांदेडकडे परतलेल्या सद्भावना यात्रेचे नरसी येथे स्वागत करण्यात आले. यावेळी सय्यद अजीम, गजानन चौधरी, अनिल शीरमवार, विलास तेलंगवार, शुभम साखरे, नारायण सावकार, बबलू बच्चेवार, शामसुंदर गायकवाड, सय्यद आदम हाजी, पो.पा. इब्राहीम पटेल, पोलीस निरीक्षक घाडगे आदी उपस्थित होते.
अनुदानाची प्रतीक्षा
कासराळी - येथील शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. पीक विमा तसेच अतिवृष्टीचे अनुदान देणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र, कासराळी येथील शेतकऱ्यांना कसलेही अनुदान मिळाले नाही. लोकप्रतिनिधीही याकडे लक्ष देण्यास तयार नसल्याचा आरोप होत आहे.
पीक विम्याची मागणी
बारड - परिसरातील शेतकऱ्यांना पीक विमा लवकर मिळवून द्यावा, अशी मागणी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे करण्यात आली. भोकर येथील एका कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून परत नांदेडला जात असताना बारड येथील कोरे मार्केटमध्ये चव्हाण यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी संवाद साधून चव्हाण यांचे लक्ष वेेधले. यावेळी श्रीराम कोरे, उत्तमराव लोमटे, आनंदराव गादीलवार, दिलीपराव कोरे, प्रताप देशमुख, अशोकराव देशमुख, गोपाळ देशमुख, संजय आठवले, नरसिंग आठवले, दशरथ आडे, पंजाब आडे, उत्तम पवार, बाबूराव बिच्चेवार, किशोर पिल्लेवाड, गजानन कऱ्हाळे आदी उपस्थित होते.