मालेगाव ग्रापं निवडणूकीत नवख्या उमेदवारांना मिळणार संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:15 AM2020-12-23T04:15:06+5:302020-12-23T04:15:06+5:30

मालेगाव : अर्धापूर तालूक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असणा-या मालेगाव ग्रामपंचायत निवडणूकीसाठी विविध पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडून पॅनल निवडीसाठ ...

New candidates will get opportunity in Malegaon Gram election | मालेगाव ग्रापं निवडणूकीत नवख्या उमेदवारांना मिळणार संधी

मालेगाव ग्रापं निवडणूकीत नवख्या उमेदवारांना मिळणार संधी

Next

मालेगाव : अर्धापूर तालूक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असणा-या मालेगाव ग्रामपंचायत निवडणूकीसाठी विविध पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडून पॅनल निवडीसाठ अजूनही ताळमेळ बसत नसल्याचे चित्र आहे. या निवडणूकीत नवख्या व तरुण उमेदवाराला संधी मिळणार आहे.

मालेगाव ग्रामपंचायतचे सरपंचपदाचे आरक्षण यापूर्वी सर्वसाधारण उमेदवारासाठी आरक्षित झाले होते. त्यावेळी अन्नेकांनी सरपंचपदाचे बाशिंग गुडघ्याला बांधून तयारी दर्शवीली होती. अचानक हे आरक्षण निवडणुकीनंतर घोषीत होणार असल्याने अनेकांनी यातून माघार घेतली. मालेगावात सध्या काँग्रेस, भाजपा शिवसेना शेतकरी कामगार पक्ष, वांचित बहुजन आघाडी या पक्षाचे नेते आहेत. अद्यापही वरील प्रमुख पक्षात पॅनल करण्यासाठी ताळमेळ बसत नाही. या निवडणूकीत प्रस्थापित पॅनल प्रमुख व उमेदवार यांना मतदार पंसद न करित असल्याचे बोलले जात आहे. त्यामूके तेच तेच उमेदवार नको म्हणून उचशिक्षित उमेदवाराला या निवडणूकीत संधी मिळणार आहे, मालेगावातीन गटातटातील राजकारणाचा फायदा नव्या उमेदवारास मिळणार आहे.

भाजपाकडून डॉ.लक्ष्मण इंगोले बालाजी मरकुंदै, कृष्णा पाटील, काँग्रेसकडून बळवंत इंगोले, केशवराव इंगोले, शिवसेनेकडून प्रल्हाद इंगोले, नागोराव इंगोले, सुदाम चौरे, शेतकरी कामगार पक्षा कडून सुभांशिष कामे वार आदी नेते प्रमुख नेते पॅनल तयार करीत असल्याची माहिती आहे. परंतु अद्यापही निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले नाही.

मात्रा इच्छुक उमेदवार कुठल्याही पॅनल कडून उमेदवारी मिळेल अथवा न मिळो उमेदवारी अर्ज भरण्यासाठी व कागदपत्रे जमावा -जमाव करीत धावपळ करीत आहेत. काँग्रेस भाजपा शिवसेना शेतकरी कामगार पक्ष याच नेत्याच्या पॅनल मध्ये निवडणूक होईल की महाविकास आघाडी व भाजपा त सरळ निवडणूक होईल हे महत्त्वाचे आहे. पालकमंत्री आशोकराव चव्हाण व खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांची या निवडणुकीत महत्वाची भूमिका असणार असल्याचे बोलले जात आहे. मालेगाव ग्रा.पं. निवडणुकीत युवा व नवख्या उमेदवारांना संधी मिळणार हे मात्र निश्चित आहे.

Web Title: New candidates will get opportunity in Malegaon Gram election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.