एनआयएने नांदेडमध्ये एकाला उचलले; टेरर फंडिंग प्रकरणी देशभरात कारवाई
By शिवराज बिचेवार | Published: September 22, 2022 12:53 PM2022-09-22T12:53:08+5:302022-09-22T12:53:25+5:30
महिनाभरपूर्वीच नांदेडमध्ये एनआयए ची दिल्ली ची टीम पहाटे तीन वाजता धडकली होती.
नांदेड- टेरर फंडिंग प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेकडून देशभरात पापुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांवर धाडी टाकण्यात येत आहेत. नांदेडमध्ये ही देगलूर नाका भागातून मेहराज अन्सारी या पीएफआय च्या सदस्याला एनआयए ने ताब्यात घेतले आहे.
महिनाभरपूर्वीच नांदेडमध्ये एनआयए ची दिल्ली ची टीम पहाटे तीन वाजता धडकली होती. त्यावेळी देगलूर नाका भागातून एका मौलवी सह अन्य तिघांना ताब्यात घेऊन तब्बल 12 तास चौकशी केली होती. त्यानंतर नोटीस देऊन त्यांना सोडले होते. त्यानंतर बुधवारी रात्री एनआयए चे पथक पुन्हा नांदेड शहरात दाखल झाले. एटीएस च्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन देगलूर नाका भागात छापा मारला. पीएफआय च्या मेहराज अन्सारी याला ताब्यात घेतले. अन्सारी या भागात किराणा आणि इतर वस्तू विक्रीचे दुकान आहे.रात्रीपासून एटीएस कार्यालयात त्याची चौकशी सुरू आहे.