बिल्डर संजय बियाणी हत्येतील शूटरला एनआयएने पकडले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 08:27 PM2023-01-27T20:27:34+5:302023-01-27T20:28:16+5:30

मोहालीत पोलिसांच्या हेडक्वार्टरवरही केला होता हल्ला

NIA nabs shooter in builder Sanjay Biyani murder | बिल्डर संजय बियाणी हत्येतील शूटरला एनआयएने पकडले

बिल्डर संजय बियाणी हत्येतील शूटरला एनआयएने पकडले

Next

नांदेड : येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची ५ एप्रिल २०२२ रोजी घरासमोर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमाईंड दहशतवादी हरविंदरसिंघ रिंदा असून त्याच्या दोन शार्पशूटरने बियाणी यांच्यावर गोळीबार केला होता. त्यातील फरार असलेला दुसरा मुख्य शूटर दीपक सुरेश रांगा याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने नेपाळ बॉर्डरवर पकडले आहे.

या शूटरच्या शोधासाठी नांदेड पोलिसांची पथके अनेक राज्यांत जाऊन आली होती. आता शूटरच्या अटकेमुळे बियाणी यांच्या हत्येसह इतर घटनांतील अनेक बाबी समोर येणार आहेत. बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची खंडणीच्या कारणावरून हरविंदरसिंघ रिंदा याच्या साथीदाराने गोळ्या घालून हत्या केली हाेती. त्यामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे यांनी बियाणींच्या घरी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले होते. तर दुसरीकडे रिंदाच्या दहशतीमुळे नांदेड शहरातील अनेक मोठे व्यावसायिक, व्यापारी यांनी स्थलांतराची तयारी केली होती. 

या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. या पथकाने बियाणी हत्येच्या कटात सहभागी असलेल्या १५ जणांना अटक केली आहे. त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली. परंतु बियाणींवर गोळीबार करणारे दोन शूटर फरार होते. दिल्ली पोलिसांनी काही महिन्यापूर्वी गुजरातमधून एका शूटरला अटक केली. मोहाली बॉम्बस्फोट प्रकरणात तो सध्या पंजाब पोलिसांच्या ताब्यात आहे. तर मुख्य शूटर असलेला दीपक सुरेश रांगा हा यंत्रणांना गुंगारा देत होता. बुधवारी एनआयएने रांगाला नेपाळ बॉर्डरवरून अटक केली आहे. रांगा याने पंजाब पोलिसांच्या गुप्तचर विभागाच्या हेडक्वार्टरवर रॉकेट हल्ला केला होता. आता त्याच्या अटकेमुळे बियाणी हत्येसह इतरही अनेक प्रकरणांचे धागेदोरे यंत्रणांच्या हाती लागणार आहेत.

Web Title: NIA nabs shooter in builder Sanjay Biyani murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.