जिल्ह्यात गुरूवारी एकही मृत्यू नाही, नवे १२७ बाधित आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:13 AM2021-06-11T04:13:32+5:302021-06-11T04:13:32+5:30
जिल्ह्यात गुरूवारी कोरोनाच्या २ हजार ९९९ संशयितांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात १ हजार ८६८ अहवाल निगेटिव्ह आले तर १२७ ...
जिल्ह्यात गुरूवारी कोरोनाच्या २ हजार ९९९ संशयितांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात १ हजार ८६८ अहवाल निगेटिव्ह आले तर १२७ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोना रूग्णांची एकूण संख्या ९० हजार ९२६ वर पोहोचली आहे. गुरूवारी आरटीपीसीआर तपासणीत मनपा हद्दीत ३१ रूग्ण आढळले. तर नांदेड ग्रामीणमध्ये १७, अर्धापूर १, हदगाव ३, कंधार २, किनवट २, लोहा २, मुखेड ३, नायगाव १, माहूर १, मुदखेड १, उमरी १, परभणी २, यवतमाळ १, हिंगोली २ आणि औरंगाबाद जिल्ह्यातील २ रूग्ण बाधित सापडले.
ॲंटिजन तपासणीत मनपा हद्दीत २४, नांदेड ग्रामीण १४, अर्धापूर १, देगलूर २, हदगाव १, हिमायतनगर १, कंधार २, लोहा २, हिंगोली १, मुखेड २, उमरी १, परभणी ३ आणि यवतमाळ जिल्ह्यातील एक रूग्ण बाधित आढळला.
जिल्ह्यात गुरूवारी एकही मृत्यू झाला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात १ हजार ८९४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. गुरूवारी १३९ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यात विष्णूपुरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ५, जिल्हा रूग्णालय २, मुखेड कोविड रूग्णालय १, देगलूर ३, किनवट १, भोकर २, अर्धापूर ३ आणि खासगी रूग्णालयातील २४ रूग्णांचा समावेश आहेत. गृह विलगीकरणात असलेले, एनआरआय भवन येथील ९८ रूग्णांनी कोराेनावर मात केली आहे.
जिल्ह्यात सध्या ६२२ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील ११ जणांची प्रकृती गंभीर आहे. उपचार घेणाऱ्या रूग्णांमध्ये विष्णूपुरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २२, जिल्हा रूग्णालय नांदेड ३७, लोहा कोविड रूग्णालय ३, मुखेड १, किनवट १८, देगलूर ६, हदगाव २, खासगी रूग्णालयात ३३ आणि गृह विलगीकरणात मनपा अंतर्गत ३८३ आणि विविध तालुक्यांतर्गत ११७ रूग्ण उपचार घेत आहेत.
जिल्ह्यात कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९६.६४ टक्क्यांवर पोहोचले आहे.