जिल्ह्यात ३० टक्के शिक्षकांचे ना लसीकरण, ना कोरोना टेस्टिंग !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:14 AM2021-07-20T04:14:22+5:302021-07-20T04:14:22+5:30
आजपर्यंत ४०८ शाळा प्रत्यक्षात सुरू झाल्या असून, उर्वरित शाळांना ग्रामपंचायतीची एनओसी मिळणे बाकी आहे. त्यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न सुरू ...
आजपर्यंत ४०८ शाळा प्रत्यक्षात सुरू झाल्या असून, उर्वरित शाळांना ग्रामपंचायतीची एनओसी मिळणे बाकी आहे. त्यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. आजपर्यंत जिल्ह्यातील ६ हजार ९१२ पैकी ४ हजार ८५१ शिक्षकांनी कोरोना लसीकरणाचा पहिला डोस घेतलेला आहे, तर पहिला आणि दुसरा डोस घेणाऱ्या शिक्षकांचे ७० टक्के एवढे प्रमाण आहे. आरटीपीसीआरद्वारे कोरोना तपासणी होत असल्याने अहवालास विलंब लागत आहे.
पहिल्या दिवशी ३९० शाळा उघडल्या
जिल्ह्यातील माध्यमिक विभागाच्या ३९० शाळा पहिल्याच दिवशी सुरू झाल्या. त्यापाठोपाठ इतर शाळा सुरू होत आहेत.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून शासनाकडून शिक्षकांची कोरोना तपासणी बंधनकारक केली आहे. हा निर्णय स्वागतार्ह आहे; परंतु त्याच दिवशी कोरोना अहवाल देणे गरजेचे आहे.- रमेशचंद्र हराळे
शासनाकडून कोरोना तपासणी बंधनकारक केली आहे. परंतु, जिल्ह्यात आरटीपीसीआरद्वारे तपासणी करावी लागत असल्याने त्याच दिवशी अहवाल मिळत नसल्याने अडचणी येत आहेत.- रमेश पवार
शिक्षकांची आरटीपीसीआर सुरू
शिक्षकांची कोरोना आरटीपीसीआर प्रणालीचा वापर करून कोरोना तपासणी केली जात आहे. संबंधित आरोग्य केंद्राच्या सहकार्याने जवळपास ६० टक्के शिक्षकांची तपासणी झाली. सरासरी ७० टक्के शिक्षकांचे लसीकरण झाले आहे. - माधव सलगर, शिक्षणाधिकारी
नांदेड : शासनाच्या विविध नियमांचे पालन करून जिल्ह्यातील माध्यमिक शाळा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांची ७० टक्के उपस्थिती लागत असली तरीही ३० टक्के शिक्षक विना तपासणी व लसीकरणाशिवाय हजेरी लावत आहेत.
आजपर्यंत ४०८ शाळा प्रत्यक्षात सुरू झाल्या असून, उर्वरित शाळांना ग्रामपंचायतीची एनओसी मिळणे बाकी आहे. त्यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. आजपर्यंत जिल्ह्यातील ६ हजार ९१२ पैकी ४ हजार ८५१ शिक्षकांनी कोरोना लसीकरणाचा पहिला डोस घेतलेला आहे, तर पहिला आणि दुसरा डोस घेणाऱ्या शिक्षकांचे ७० टक्के एवढे प्रमाण आहे. आरटीपीसीआरद्वारे कोरोना तपासणी होत असल्याने अहवालास विलंब लागत आहे.
पहिल्या दिवशी ३९० शाळा उघडल्या
जिल्ह्यातील माध्यमिक विभागाच्या ३९० शाळा पहिल्याच दिवशी सुरू झाल्या. त्या पाठोपाठ इतर शाळा सुरू होत आहेत.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून शासनाकडून शिक्षकांची कोरोना तपासणी बंधनकारक केली आहे. हा निर्णय स्वागतार्ह आहे. परंतु, त्याच दिवशी कोरोना अहवाल देणे गरजेचे आहे.- रमेशचंद्र हराळे
शासनाकडून कोरोना तपासणी बंधनकारक केली आहे. परंतु, जिल्ह्यात आरटीपीसीआरद्वारे तपासणी करावी लागत असल्याने त्याच दिवशी अहवाल मिळत नसल्याने अडचणी येत आहेत.- रमेश पवार
शिक्षकांची आरटीपीसीआर सुरू
शिक्षकांची कोरोना आरटीपीसीआर प्रणालीचा वापर करून कोरोना तपासणी केला जात आहे. संबंधित आरोग्य केंद्राच्या सहकार्याने जवळपास ६० टक्के शिक्षकांची तपासणी झाली. सरासरी ७० टक्के शिक्षकांचे लसीकरण झाले आहे. - माधव सलगर, शिक्षणाधिकारी