नांदेडातच नव्हे, तर राज्यभरात खड्डे ही चंद्रकांत पाटलांची देण : अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 06:39 PM2021-08-24T18:39:43+5:302021-08-24T18:43:02+5:30

Ashok Chavhan : टप्प्याटप्प्याने कामे करून नांदेडकरांसह राज्यातील जनतेचा प्रवास सुखमय व्हावा यासाठी आमचा प्रयत्न

Not only in Nanded, but all over the state, pits are the gift of Chandrakant Patil | नांदेडातच नव्हे, तर राज्यभरात खड्डे ही चंद्रकांत पाटलांची देण : अशोक चव्हाण

नांदेडातच नव्हे, तर राज्यभरात खड्डे ही चंद्रकांत पाटलांची देण : अशोक चव्हाण

Next
ठळक मुद्देराज्यभरातील खड्डे बुजविण्याचे काम सुरू 

नांदेड : नांदेड जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यभरातील बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. मागील पाच वर्षांत रस्त्याची कामे व्यवस्थित न झाल्याने अन् चंद्रकांत पाटील ( Chandrakant Patil ) यांनी दिलेल्या मुदतीत ३१ डिसेंबरपर्यंत खड्डे बुजविले गेले नाही, त्याचा हा परिणाम आहे. त्यात कोविडमुळे राज्याचे उत्पन्न घटले असून, त्यामुळे कामांवर मर्यादा येऊन पडल्या आहेत. परंतु, आम्ही जास्तीत जास्त गतीने कामे करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे मत सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण ( Ashok Chavhan ) यांनी व्यक्त केले. ( Not only in Nanded, but all over the state, pits are the gift of Chandrakant Patil) 

नांदेड येथे काँग्रेसच्या वतीने २४ ऑगस्ट रोजी आयोजित विभागीय आढावा बैठकीच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी समन्वयक विनायक देशमुख, जि. प. अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर मोहिणी येवनकर, माजी मंत्री डी. पी. सावंत, प्रतोद आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार मोहनराव हंबर्डे, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, सभापती संजय बेळगे, सभापती वीरेंद्रसिंह गाडीवाले, प्रवक्ता संतोष पांडागळे, नगरसेवक मुंतजीब, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा - कोणाची काय शैली आम्हाला माहिती नाही; राणेंनी गुन्हा केला, कारवाई होणारच

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तीन हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यात कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भातील रस्त्यांचा समावेश आहे. खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे. टप्प्याटप्प्याने कामे करून नांदेडकरांसह राज्यातील जनतेचा प्रवास सुखमय व्हावा यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे चव्हाण म्हणाले. मराठा आरक्षणाबाबत चव्हाण म्हणाले, आरक्षणास काँग्रेसचे समर्थनच आहे. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागू देता मराठा आरक्षण कसे देता येईल, या अनुषंगाने राज्य शासनास जे जे काही करता येईल, ते करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच संभाजीराजेंचा मी नेहमीच आदर केलेला आहे. त्यांची आणि माझी मुंबईत भेट झाली. आरक्षणाबाबत गटनेत्यांसह घटक पक्षातील सर्व नेत्यांची भेट घेतली.

चार जिल्ह्यांची आढावा बैठक
नांदेडात २४ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता भक्ती लॉन्स येथे नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली या चार जिल्ह्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्याचबरोबर सकाळी दहा वाजता कुसुम सभागृह येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या प्रारंभाचे औचित्य साधून व्यर्थ न हो बलिदान, चलो बचाए संविधान याअंतर्गत जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या परिवारातील सदस्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

कट्टरतावाद अखंडतेला घातक
भाजप धर्मवाद आणि कट्टरतावादाकडे देशाला घेऊन जात आहे. ही बाब लोकशाहीसह देशाच्या अखंडता आणि एकात्मतेसाठी घातक आहे. त्याला वेळोवेळी सडेतोड उत्तर देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्यामुळेच काँग्रेसची आयडालॉजी पुन्हा लोकांपर्यंत घेऊन जाण्याचे काम काँग्रेसने हाती घेतले आहे. नवतरुणांना स्वातंत्र्याचा खरा इतिहास कळावा यासाठीही काँग्रेसकडून प्रयत्न सुरू असल्याचे अशोकराव चव्हाण यांनी सांगितले.

पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचाच उमेदवार
महाविकास आघाडीच्या धोरणात्मक निर्णयानुसार ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा आमदार होता, त्या ठिकाणी त्याच पक्षाचा उमेदवार दिला जाणार आहे. त्यामुळे देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचाच उमेदवार राहील आणि तो शंभर टक्के विजयी होईल, असा विश्वास अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केला.

Web Title: Not only in Nanded, but all over the state, pits are the gift of Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.