नांदेड मनपातील लेटलतिफ ९० कर्मचाऱ्यांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 12:00 AM2018-05-12T00:00:43+5:302018-05-12T00:00:43+5:30

महापालिकेचे नूतन आयुक्त लहूराज माळी यांनी नांदेडात आपल्या धडाकेबाज इनिंगला सुरुवात केली असून पदभार स्वीकारताच दुस-या दिवशीच अतिक्रमणांवर हातोडा चालविला़ त्यानंतर महापालिकेत उशिराने येणा-या तब्बल ९० अधिकारी, कर्मचा-यांना वेळेचे महत्त्व पटवून नोटिसा बजावल्या़ आयुक्तांच्या या कारवाईमुळे महापालिकेतील लेटलतिफांचे धाबे दणाणले आहेत़

Notification for 90 employees of Nanded Municipal staff | नांदेड मनपातील लेटलतिफ ९० कर्मचाऱ्यांना नोटिसा

नांदेड मनपातील लेटलतिफ ९० कर्मचाऱ्यांना नोटिसा

Next
ठळक मुद्देनूतन आयुक्तांची कारवाई : सलग दोन दिवस अधिकारी, कर्मचारी उशिराने कार्यालयात

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : महापालिकेचे नूतन आयुक्त लहूराज माळी यांनी नांदेडात आपल्या धडाकेबाज इनिंगला सुरुवात केली असून पदभार स्वीकारताच दुस-या दिवशीच अतिक्रमणांवर हातोडा चालविला़ त्यानंतर महापालिकेत उशिराने येणा-या तब्बल ९० अधिकारी, कर्मचा-यांना वेळेचे महत्त्व पटवून नोटिसा बजावल्या़ आयुक्तांच्या या कारवाईमुळे महापालिकेतील लेटलतिफांचे धाबे दणाणले आहेत़
माळी यांनी महापालिकेची सूत्रे हाती घेतल्यानंतर दुस-याच दिवशी विमानतळाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणा-या फळ बाजारांवर हातोडा चालविला़ गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी सुरु असलेल्या फळ बाजारामुळे विमानांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला होता़
सलग दोन दिवस कारवाई करीत तब्बल २०० टिनशेड जमीनदोस्त करण्यात आले़ त्यानंतर गुरुवारी सकाळी कार्यालयात आल्यानंतर सव्वादहा वाजेच्या सुमारास आयुक्त लहूराज माळी यांनी कर्मचारी व अधिका-यांचे हजेरीपुस्तक आपल्या ताब्यात घेतले़ गुरुवारी अनेक कर्मचारी उशिराने आले होते़ त्यांची नोंद या रजिस्टरमध्ये झाली नाही़ त्यामुळे ही बाब सर्व अधिकारी व कर्मचा-यांना माहीत झाली होती़ परंतु, कर्मचारी, अधिका-यांनी ही बाब फारशी गांभीर्याने घेतली नव्हती़ त्यानंतर शुक्रवारी सकाळी दहाच्या ठोक्याला आयुक्तांनी पुन्हा हजेरीपुस्तक आपल्या ताब्यात घेतले़ पहिल्या दिवशी उशिराने आलेल्या कर्मचा-यांनी त्यापासून काही बोध घेतला नसल्याचे सलग दुस-या दिवशीही स्पष्ट झाले़ कर्मचारी आणि अधिकारी कार्यालयात वेळेवर येत नसल्याचे आयुक्तांच्या लक्षात आले़
त्यामुळे आयुक्त लहूराज माळी यांनी ९० कर्मचारी, अधिकाºयांना नोटिसा बजावून खुलासा मागविला आहे़ त्यात लेटलतिफ असलेल्या उपअभियंता सतीश ढवळे, कार्यालय अधीक्षक रत्नाकर जोशी, कनिष्ठ अभियंता नरेंद्र सुजलेगावकर, उपअभियंता सुनील देशमुख, दिलीप टाकळीकर, श्रीकृष्णा धाकडे या अधिकाºयांसह अनेक कर्मचाºयांचाही समोवश आहे़ आयुक्तांच्या या कारवाईमुळे अधिकारी, कर्मचा-यांमध्ये मात्र खळबळ उडाली आहे़

हा प्रकार गंभीर
अधिकारी, कर्मचा-यांनी कार्यालयात वेळेवर यायलाच पाहिजे़ पहिल्या दिवशी हजेरी पुस्तक ताब्यात घेतल्यानंतर किमान दुस-या दिवशीही तरी अधिकारी, कर्मचारी वेळेवर येतील अशी अपेक्षा होती़ परंतु,, दुस-या दिवशीही लेटलतिफांची संख्या मोठी होती़ ही बाब गंभीर असून यापुढे असा प्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा आयुक्त माळी यांनी दिला़
विभागप्रमुखांना वेगळा न्याय का?
महापालिकेतील अधिकारी, कर्मचा-यांचे हजेरीपुस्तक आहे़ परंतु, त्यामध्ये विभागप्रमुख आणि सहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिका-यांची नावे त्यामध्ये नाहीत़ त्यामुळे विभागप्रमुख, सहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिका-यांना यातून सूट आहे काय? त्यांच्यासाठी वेगळा न्याय कशासाठी? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे़

Web Title: Notification for 90 employees of Nanded Municipal staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.