आता खासगी प्रवासी वाहनांची २५ टक्के दरवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:24 AM2021-08-17T04:24:54+5:302021-08-17T04:24:54+5:30
नांदेड येथून देगलूर, हिंगोली, लातूर, भोकर, पूर्णा आदी मार्गावर मोठ्या प्रमाणात खासगी ट्रॅव्हल्स आणि इतर वाहने धावतात. मागील अनेक ...
नांदेड येथून देगलूर, हिंगोली, लातूर, भोकर, पूर्णा आदी मार्गावर मोठ्या प्रमाणात खासगी ट्रॅव्हल्स आणि इतर वाहने धावतात. मागील अनेक दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या किमतीत दररोजच वाढ होत आहे. त्यामुळे पूर्वीच्या तिकीट दरानुसार भाडे परवडत नसल्याचे कारण देत खासगी वाहनधारकांनी भाड्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तर काहींनी भाडेवाढ केली आहे.
कोरोना काळात भाडे लागले नाही. त्यात बँका, फायनान्स हप्ता थांबला तर वाहन ओढून नेण्याची धमकी देत आहेत. अशा परिस्थितीत वाहनांचे हप्ते कुठून भरायचे कसे.
- प्रभाकर राऊत, वाहनचालक
कोरोनामुळे मोठे नुकसान झाले. त्यात आता भाडे लागत आहेत तर पेट्रोल, डिझेलचे दर वाढले आहेत. अशा परिस्थितीत भाडेवाढ करण्याशिवाय पर्याय नाही, अन्यथा हप्तेदेखील निघणार नाहीत. - संजय कुऱ्हे