आता बैठका, चर्चा नको; कृती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 12:34 AM2019-06-03T00:34:13+5:302019-06-03T00:36:34+5:30

जिल्हा दुष्काळाने होरपळून निघत आहे. संभाव्य दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेवून डिसेंबरमध्येच टंचाई आराखड्यासंदर्भात विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका घेतल्या होत्या.

now don't discuss; Take action | आता बैठका, चर्चा नको; कृती करा

आता बैठका, चर्चा नको; कृती करा

Next
ठळक मुद्देकाँग्रेस आमदारांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचनाजिल्ह्यात दुष्काळ, पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त

नांदेड : जिल्हा दुष्काळाने होरपळून निघत आहे. संभाव्य दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेवून डिसेंबरमध्येच टंचाई आराखड्यासंदर्भात विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका घेतल्या होत्या. त्यानंतर काही दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांनी टंचाई व खरीप हंगामासंदर्भात मुंबईत बैठक घेतली. बैठका होत असल्या तरीही कृती मात्र होत नसल्याचे दिसत असून प्रशासनाने आता कृती करावी, असे जिल्ह्यातील काँग्रेस आमदारांनी प्रशासनाला सुचवले आहे.
मागील अनेक महिन्यांपासून केवळ बैठकांचा ‘फार्स’ चालू आहे. बैठकांवर बैठका घेण्यापेक्षा दुष्काळाच्या भीषण समस्येला तोंड देणाºया नागरिकांना दिलासा देण्यासाठी आता बैठका नको तर झालेल्या बैठकांमधील निर्णयावर कृती करा, अशा सूचना जिल्ह्यातील काँग्रेस आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदनाद्वारे दिल्या आहेत.
नांदेड जिल्हा दुष्काळाने होरपळून निघत आहे. या दुष्काळावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी अनेक सूचना केल्या आहेत. ज्यामध्ये मागेल त्याला टँकर, नवीन विंधन विहिरी घेणे, जनावरांसाठी चारा छावण्या उभारणे, जुन्या पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती करणे, रोजगार हमी योजनेची कामे सुरु करणे आदी विषयांवर तात्काळ अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.
पालकमंत्री रामदास कदम यांनी मुंबईत घेतलेल्या टंचाई आढावा बैठकीत नांदेड शहरातील पाणीटंचाई लक्षात घेता सिद्धेश्वर धरणातील मृतसाठ्यातून शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पाणी उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी आम्ही केली होती. या मागणीसंदर्भात पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सिद्धेश्वरचे पाणी नांदेडला देण्याचे पाटबंधारे विभागाला आदेश दिले.
मुंबई येथे झालेल्या बैठकीतील अन्य काही निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ होणे आवश्यक आहे. मुंबईतच पालकमंत्र्यांनी खरीप हंगामासंदर्भात बैठक घेतली. या बैठकीमध्ये जिल्ह्यात केवळ दीड टक्केच पीककर्ज वाटप झाल्याचे उघड झाले. आम्ही सर्वांनी पालकमंत्र्यांकडे आग्रही भूमिका मांडली. बँक अधिकाºयांची उदासीनता लक्षात आणून दिली. त्यानंतर कर्ज वाटपाची गती वाढविण्यासंदर्भाचा बैठकीत निर्णय घेण्यात आला.
या सर्व बाबी मुंबई येथील पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत चर्चिल्या गेल्या असताना आता नव्याने आणखी आमदार व खासदार यांनी बैठका घेण्याची गरज काय? असा सवाल माजी पालकमंत्री व काँग्रेसचे आ. डी. पी. सावंत, आ.वसंतराव चव्हाण, आ. अमरनाथ राजूरकर यांनी म्हटले आहे.
जिल्ह्यात उरला केवळ सहा टक्के जलसाठा
जिल्ह्यात लहान-मोठे असे १११ प्रकल्प आहेत. दोन मोठे प्रकल्प असून त्यात मानार आणि विष्णूपुरी प्रकल्पाचा समावेश होतो. विष्णूपुरी प्रकल्पात आजघडीला केवळ ०.२२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. केवळ ०.१८ दलघमी पाणी उरले आहे. मानार प्रकल्पात १०.९७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. जिल्ह्यात असलेल्या ९ मध्यम प्रकल्पांत ५.७६ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. उच्चपातळी बंधाºयात ८.९७ दलघमी साठा शिल्लक असून ८ उच्च पातळी बंधारे जिल्ह्यात आहेत. जिल्ह्यातील ८८ लघुप्रकल्पांत ५.४५ टक्के म्हणजे १०.४१ दलघमी जलसाठा उरला आहे. या जलसाठ्यावर तहान भागवावी लागणार आहे. नांदेडचा पाणीप्रश्न बिकट बनला आहे.

Web Title: now don't discuss; Take action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.